एकादशी-प्रदाेष व महाशिवरात्री ! जाणून घ्‍या सलग उपवास आणि ‘पारणा’ विषयी | पुढारी

एकादशी-प्रदाेष व महाशिवरात्री ! जाणून घ्‍या सलग उपवास आणि 'पारणा' विषयी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदा ७ मार्च रोजी भागवत एकादशी असून, दुसरे दिवशी ८ मार्च रोजी प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. उपवास पारणा आणि उपवास याची व्यवस्था कशी करावी ? याबाबत पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिलेली माहिती जाणून घेवूया…
(दाते पंचांग, शक १९४६, पृष्ठ क्रमांक ८६)

सलग उपवास आणि पारणा…

Maha Shivaratri 2024

अनेक वेळेस एकादशीचे दुसरे दिवशी प्रदोषाचा उपवास असतो किंवा प्रदोष व शिवरात्रीचा उपवास एकाच दिवशी असतो. एकादशी आणि सोमवार इ. वारांचा उपवास एकाच दिवशी येत असतो. एखाद्या व्रताचा उपवास सोडण्याचे (पारण्याचे) दिवशी पुन्हा एखाद्या व्रताचा उपवास असतो. अशा वेळेस एकाच दिवशी उपवास आणि पारणा करताना उपवासास महत्त्व देऊन त्याच दिवशी पारणा करताना म्हणजे उपवास सोडताना भाताच्या घासाचा फक्त वास घ्यावा किंवा अन्न शिजविणारच नसल्यास देवपूजेचे तीर्थ घेऊन मी पारणा ( उपवास सोडणे ) करीत आहे, असा संकल्प करावा. नंतर दुसऱ्या व्रताचा उपवास सुरु ठेवावा, म्हणजे उपवासाचे पदार्थ खावेत. उपवासाचे दिवशी पारणा किंवा पारण्याचे दिवशी उपवास असताना वर सांगितल्याप्रमाणे आचरण करावे, असे मोहन दाते सांगतात. ( Maha Shivaratri 2024)

 

Back to top button