राशिभविष्य (२६ नोव्हेंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (२६ नोव्हेंबर २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-वक्तशीरपणा महत्त्वाचा. दिलेला शब्द पाळा. प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येण्याची संभावना. आधी केलेल्या गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-कौटुंबिक कलह टाळावा. प्रत्येकाचे मत जाणून मगच निर्णय घ्यावा. संतुलन साधणे महत्त्वाचे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. अनावश्यक भीती निर्माण होईल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-बौद्धिक क्षमता वाढेल. मनासारखी खरेदी होईल. कला-गुणांना वाव मिळेल. तेजस्वी कार्य कराल. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क-मानसिक संतुलन महत्त्वाचे आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. परिश्रम घेणे आवश्यक. वस्तू सांभाळून ठेवा. हरवण्याची शक्यता आहे. आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह-ठरवलेल्या कामांमध्ये यश मिळेल. ईष्ट ते साध्य होईल. आनंददायी दिवस. चांगल्या आठवणींना उजाळा द्याल. मनासारख्या घटना घडतील. यशाकडे वाटचाल कराल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या-आरोग्याची काळजी घ्यावी. नियमांचे पालन आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आळशीपणा व परावलंबी वृत्ती, यामुळे नुकसानकारक दिवस.

राशिभविष्य

तुळ

 

तुळ-अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक- सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. आर्थिक प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु-नियमित व्यायाम व योग साधनेची गरज. सकारात्मक विचार महत्त्वाचे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. दंडात्मक कारवाई होऊ शकते. उत्साह महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर-वादविवादात पडू नका. चूक मान्य करावी लागेल. सामंजस्याने विषय सोडवा. लोकमत जाणूनच योग्य तो निर्णय घेणे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. छोटे प्रवास घडतील. भागीदारीमधे लाभ होईल. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल
.

राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन-योग्य दिशा व अचूक निर्णयामुळे कार्यसिद्धी योग. जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. पदोन्नतीचे योग संभवतात. शत्रू पीडा कमी होईल.

Back to top button