जागतिक संकेताचा ‘इफेक्‍ट’, सेन्‍सेक्‍समध्‍ये घसरण, निफ्‍टीनेही अनुभवली पडझड | पुढारी

जागतिक संकेताचा 'इफेक्‍ट', सेन्‍सेक्‍समध्‍ये घसरण, निफ्‍टीनेही अनुभवली पडझड

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशांतर्गत शेअर बाजारावर आज (दि.३) प्रारंभीच्‍या व्‍यवहारात जागतिक संकेतांचा परिणाम दिसले. २०० अंकांची घसरण अनुभवत सेन्सेक्स 71700 वर आला . निफ्टीही 55 अंकांची पडझड अनुभवत 21,610 अंकांवर व्‍यवहार करत आहे. यापूर्वी मंगळवारी ( दि.२) सेन्सेक्स ३७९ अंकांनी घसरुन ७१,८९२ वर बंद झाला होता.

आज शेअर बाजारातील व्‍यवहाराची सुरुवात नकारात्‍मक झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत आहेत. संमिश्र जागतिक संकेतांचा परिणाम बाजारावर दिसत आहे. 200 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 71700 च्या खाली घसरला आहे. तर निफ्टी 55 अंकांनी घसरून 21,610 अंकांवर व्‍यवहार करत आहे.

आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्सची सर्वाधिक विक्री

बाजारात सर्वाधिक विक्री आयटी आणि बँकिंग क्षेत्रात होत आहे. JSW स्टील निफ्टीमध्ये सर्वाधिक तोट्यात आहे.

Back to top button