Diwali Besan Ladu Recipe : तोंडात लगेच विरघळतील असे बेसणाचे लाडू कसे बनवावेत? | पुढारी

Diwali Besan Ladu Recipe : तोंडात लगेच विरघळतील असे बेसणाचे लाडू कसे बनवावेत?

पुढारी ऑनलाईन डेस्क : दसऱ्याची लगबग संपली आणि नुकतेच सर्वाच्या आवडीचा सण म्हणजे, दिवाळीच्या धामधूमीला सुरूवात झाली. यंदाच्या दिवाळी लहानापासून ते मोठ्यापर्यत सर्वजण आनंदात साजरी करत आहेत. मग ते दिवाळीत कपड्याच्या खरेदीपासून ते खाण्याच्या पदार्थापर्यत. यासोबत खऱ्या अर्थाने दिवाळीत लाडू, चिवड, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, भाकरवडी अशा अनेक पदार्थाची मेजवाणीच असते. दरम्यान कळीचे आणि रव्याचे लाडू प्रत्येकाच्या घराची लज्जत वाढविते. परंतु, लहानापासून मोठ्यापर्यत ‘बेसण लाडू’ खूपच आवडतात. चला तर पाहूयात ‘बेसण लाडू’ कसे बनवाचे… ( Diwali Besan Ladu Recipe )

No Image

Recipe By अनुराधा कोरवी

Course: गोड पदार्थ Cusine: महाराष्ट्रीयन Difficulty: : सोपं

Preparing Time

३० minutes

Cooking Time

३० minutes

Calories

kcal

INGREDIENTS

  1. दोन वाटी बेसण

  2. पाऊण कप तूप

  3. चार कप पिठी साखर

  4. अर्धा चमचा वेलची पावडर

  5. तीन-चार चमचे दूध

  6. आवडीनुसार ड्रायफूड्स

DIRECTION

  1. बेसणचा लाडू तयार करण्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये तूप आणि बेसण मिक्स करा.

  2. ३० ते ४० मिनिटं खरपूस रंग येईपर्यंत बेसण चांगले भाजून घ्या.

  3. त्यानंतर थोडासा बेसनाला सुंगध येऊ लागले.

  4. त्यानंतर भाजलेलं बेसण एका परातीत काढून घ्या आणि त्याला किमान २ तास तरी थंड होऊ द्या.

  5. त्यात ड्रायफूड्स (बदाम, काजू, पिस्ता...) घाला.

  6. त्यानंतर पिठीसाखर आणि वेलदोड्याची पावडर मिक्स करा.

  7. बेसणात टाकलेले सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करावे.

  8. यानंतर लाडूचे पीठ थोडे पातळ झाल्यानंतर लाडू वळावेत.

  9. तयार झाले दिवाळीसाठी खास बेसणाचे लाडू.

NOTES

  1. तुम्ही मधुमेहाचे (डायबेटीज) पेशंट असाल आणि साखर तुम्हाला वर्ज्य असेल, तर साखरेऐवजी खारकाची (सुखलेले खजूर) पावडरदेखील आपण वापरू शकता

 

Back to top button