Fasting Food Makhana Kheer : उपवासादरम्यानचा हेल्दी पर्याय म्हणजे मखाण्याची खीर; जरूर ट्राय करा

makhana kheer
makhana kheer

पुढारी डिजिटल : येत्या काही दिवसाच नवरात्रीला सुरुवात होईल. (Fasting Food Makhana Kheer) व्रतवैकल्याच्या या दिवसांत काहीतरी वेगळं आणि हेल्दी खाण्याचा पर्याय प्रत्येकजण निवडत असतो. उपवासाच्या दरम्यानचा टेस्टी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Fasting Food Makhana Kheer)

मखाण्याकडे आजकाल हेल्दी फूड म्हणून पाहिलं जातं. यांची उपवासासाठी अत्यंत रुचकर अशी खीर केली जाते. ही आहे त्याची रेसिपी-

साहित्य :

मखाने – १ कप

तूप – १ टी स्पून

दूध – ४ १/२ कप दूध

साखर – १ टेबलस्पून

वेलची पावडर – १/४ चमचा

सजावटीसाठी केशर आणि पिस्त्यांचे कप

कृती :

गरम कढईत तूप टाकावे. त्यानंतर त्यात मखाने टाकून २ ते ३ मिनिट कुरकुरीत होईपर्यन्त भाजावेत. त्यानंतर थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यावी. एका खोल भांड्यात दूध घ्यावं. एक उकळी काढून घ्यावी. त्यानंतर त्यात साखर आणि वेलची पावडर टाकावी. यानंतर त्यात मखान्यांची पावडर टाकावी. मंद आचेवर २ ते ३ मिनिट ढवळत राहावे. शिजली कि गॅसवरुन उतरून घ्यावी. केशर आणि पिस्त्याने सजावट करून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news