Navratri 2023 Kalratri : दुर्गेचे सातवे रूप – कालरात्री

 कालरात्री
कालरात्री

एकवेणी जपाकर्ण पूरा नग्ना खरास्थिता । लम्बोष्ठी कर्णिका कर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी । वामपादोल्लसल्लोह लता कण्टक भूषणा । वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी ॥

दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या देवीचा रंग काळा आहे. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत. (Navratri 2023 Kalratri ) कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे, तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खडग (कट्यार) आहे. (Navratri 2023 Kalratri )

कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयकारी आहे. परंतु, ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णतः भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.

मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाच्या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news