Navratri 2023 : शिवपत्नी अंबिका | पुढारी

Navratri 2023 : शिवपत्नी अंबिका

शिवपत्नी अंबिका म्हणजेच उमा, त्र्यंबक म्हणजे त्रिनेत्रधारी शिव. त्यातीलच ‘अंबु’ शब्दापासून ‘अंबिका’ हे नाव आले. अंबिकेची मूर्ती कशी असावी, याचे स्पष्ट निर्देश संस्कृत ग्रंथामध्ये आढळतात. सिंहारूढाम्बिका त्र्यक्षा भूषिता दर्पणोद्वहा ।… अशा वर्णनासह आपल्यासमोर तिच्या मूर्तीचे चित्र उभे केले जाते. अंबिका सिंहावर आरूढ असते. तिला तीन नेत्र असतात. विविध अलंकार तिने घातलेले असतात. डाव्या बाजूच्या तिच्या एका हातात आरसा असतो, तर उजव्या बाजूचा एक हात वरदमुद्रेत असतो. अन्य दोन हातांमध्ये तिने ढाल-तलवार धरलेली असते. यावरून ध्यानात येते की, अंबिका हे आईचे रूप आहे. सौंदर्याचे प्रतीक आहे; सिंहावर म्हणजे निसर्गातील एका शक्तीवर ती नीतीचे रूप घेऊन आरूढ आहे आणि त्याचवेळी आयुधे सहज बाळगणारी ती शौर्यवती स्त्री आहे.

 

 

Back to top button