Horoscope Today | आजचे राशिभविष्य; सोमवार २ ऑक्‍टोबर २०२३, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य; सोमवार २ ऑक्‍टोबर २०२३, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

राशिभविष्य

मेष ः तणावमुक्तीसाठी कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका.

वृषभ

वृषभ ः कामावर लक्ष केंद्रित करा कारण आज तुम्ही चमकणार आहात. काहींना परदेशी जाण्याच्या संधी मिळण्याची शक्यता आहे.

राशिभविष्य

मिथुन ः तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गुल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही.

कर्क

कर्क ः नुकताच नैराश्याचा त्रास आला असेल तर योग्य पावले उचलली आणि सध्याच्या विचारांना प्राधान्य दिले तर समाधान आणि आराम लाभेल.

सिंह

सिंह ःआज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आणि मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल.

कन्या

कन्या ः आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल.

तुळ

तूळ ः तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आज तुम्हाला अपत्यांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे.

राशिभविष्य

वृश्चिक ः प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल. गोंधळ व नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा.

राशिभविष्य

धनु ः मित्र-मैत्रिणींबरोबर काहीतरी मस्तीखोर, उत्साही करण्यासाठी एकदम योग्य दिवस. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल िटिकणारा असेल.

राशिभविष्य

मकर ः प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव— दु:ख देईल. सुयोग्य कर्मचार्‍यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल.

कुंभ

कुंभ ः आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे.

मीन

मीन ः आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील. कला दाखविता येईल.

 

 

Back to top button