World Heart Day : यंदा वर्ल्‍ड हार्ट डे निमित्त कोलेस्‍ट्रॉलवर उत्तमप्रकारे नियंत्रण ठेवण्‍यासाठी ५ सोपे उपाय

World Heart Day : यंदा वर्ल्‍ड हार्ट डे निमित्त कोलेस्‍ट्रॉलवर उत्तमप्रकारे नियंत्रण ठेवण्‍यासाठी ५ सोपे उपाय

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्‍ड हार्ट डे जवळ आला आहे आणि हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवणाऱ्या बाबींबाबत चर्चा करण्‍याची वेळ आली आहे. पण हृदयाच्‍या आरोग्‍याची काळजी घेताना एका घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ते म्‍हणजे कोलेस्‍ट्रॉल आणि व्‍यक्तीच्‍या हृदयावर होणारे त्‍याचे परिणाम. दरवर्षाला जवळपास ४.४ दशलक्ष हृदय-विषयक आजारांच्‍या केसेस समोर येत आहेत, ज्‍यामधून निदर्शनास येते की उच्‍च कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांमुळे हृदयविषयक आजार व कार्डियोव्‍हॅस्‍कुलर समस्‍यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. पूर्वी कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आजार झालेल्‍या व्‍यक्‍तींसाठी हा धोका अधिक वाढला आहे. चला तर मग, कोलेस्‍ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्‍याच्‍या उपायांबाबत जाणून घेऊया.

तुम्‍हाला माहित आहे का १० पैकी ६ भारतीयांना उच्‍च एलडीएल कोलेस्‍ट्रॉल आहे?

कोलेस्‍ट्रॉल आणि व्‍यक्‍तीच्‍या हृदयाच्‍या आरोग्‍यावर होणारे त्‍याचे परिणाम माहित असणे आरोग्‍यदायी व दीर्घकालीन जीवनासाठी महत्त्वाचे आहे. व्‍यक्‍तीच्‍या रक्‍तामध्‍ये असलेला फॅटी घटक कोलेस्‍ट्रॉल सेल मेम्‍ब्रेन्‍स (पेशी आवरण) तयार करणे आणि हार्मोन्‍सची निर्मिती अशा शरीरातील विविध कार्यांसाठी आवश्‍यक आहे. पण कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांमध्‍ये असंतुलन निर्माण झाले, विशेषत: 'बॅड कोलेस्‍ट्रॉल' म्‍हणून संबोधले जाणारे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्‍ट्रॉल (एलडीएल-सी) मध्‍ये वाढ होते तेव्‍हा हृदयविषयक आजारांचा धोका वाढतो. दुसरीकडे, 'गुड कोलेस्‍ट्रॉल' म्‍हणून ओळखले जाणारे हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्‍ट्रॉल (एचडीएल-सी) रक्‍तप्रवाहामधील अतिरिक्‍त कोलेस्‍ट्रॉल कमी करण्‍यामध्‍ये मदत करत सक्रिय भूमिका बजावते, ज्‍यामुळे हृदयविषयक आजाराचा धोका कमी होतो. म्‍हणून, व्‍यक्‍तीच्‍या हृदयाच्‍या आरोग्‍याचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी एलडीएल-सीच्‍या पातळ्यांबाबत माहित असणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे.

मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमधील कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. झाकिया खान म्‍हणाल्‍या, "भारतात हृदयविषयक आजारांचे प्रमाण वाढत आहे आणि पाश्चिमात्‍य देशातील व्‍यक्‍तींच्‍या तुलनेत दहा वर्ष अगोदर भारतीयांना हृदयविषयक आजार होत आहेत. मी माझ्या रूग्‍णांना, विशेषत: सीव्‍हीडी हिस्‍ट्री असलेल्‍या रूग्‍णांना कोलेस्‍ट्रॉल पातळी व हृदयाचे आरोग्‍य यामधील महत्त्वाच्‍या संबंधाबाबत सांगते. एलडीएल-सी च्‍या पातळ्यांमध्‍ये वाढ झाल्‍यास हृदयविषयक आजार होण्‍याचा धोका वाढू शकतो, रक्‍तवाहिन्‍या अरूंद होण्यासह कोलेस्‍ट्रॉल ब्‍लॉकेज होऊ शकतो आणि हृदयाचा झटका व स्‍ट्रोक्‍सचा धोका वाढू शकतो. म्‍हणून नियमित तपासणी करत एलडीएल-सी पातळ्यांबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्‍हाला मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब किंवा पूर्वी अकाली कोरोनरी आर्टरी डीसीज (सीएडी)ची हिस्‍ट्री असल्‍यास धोका अनेकपटीने वाढतो."

म्‍हणून कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांचे व्‍यवस्‍थापन व नियंत्रण ठेवण्‍यासाठी सक्रिय पावले उचलणे हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी आवश्‍यक आहे, ज्‍यामुळे संभाव्‍य हृदयविषयक धोके टाळण्‍यासाठी योग्‍य निर्णय घेऊ शकता.

संबंधित बातम्या

हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी पालन करावयाचे ५ उपाय पुढीलप्रमाणे:-

1. नियमित तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन

कोलेस्‍ट्रॉलच्‍या उत्तम व्‍यवस्‍थापनासाठी त्‍याबाबत माहिती असणे आवश्‍यक आहे. कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर देखरेख ठेवण्‍यासाठी आणि हृदयाचे आरोग्‍य उत्तम असल्‍याची खात्री करण्‍यासाठी आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांकडे (डॉक्‍टर) नियमितपणे तपासणी करा. रक्‍तचाचण्‍यांमधून कोलेस्‍ट्रॉल प्रोफाइलबाबत माहिती मिळते, ज्‍यामुळे तुम्‍ही व तुमचे डॉक्‍टर तुमचा आहार, व्‍यायाम नित्‍यक्रम व आवश्‍यक असल्‍यास संभाव्‍य औषधोपचार याबाबत योग्‍य निर्णय घेऊ शकतील. वैद्यकीय सल्‍ल्‍याचे पालन करत आणि आरोग्‍याबाबत माहिती असल्‍याने तुम्‍ही कोलेस्‍ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्‍याचे योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन करू शकता.

2. व्‍यायाम करा आणि सक्रिय राहा

नियमित व्‍यायाम हृदयाचे आरोग्‍य व कोलेस्‍ट्रॉल व्‍यवस्‍थापनासाठी महत्त्वाचा आहे. कोलेस्‍ट्रॉल पातळ्या सुधारण्‍यासाठी जलद चालणे, जॉगिंग, पोहणे किंवा सायकल चालवणे अशा मध्‍यम स्‍वरूपाचे व्‍यायाम करा. व्‍यायाम केल्‍याने एचडीएल कोलेस्‍ट्रॉलमध्‍ये वाढ होते, तसेच वजनावर नियंत्रण राहते, लठ्ठपणाशी संबंधित कोलेस्‍ट्रॉलचा धोका कमी होतो. कोलेस्‍ट्रॉलवरील देखरेखीमध्‍ये अधिक सुधारणा करण्‍यासाठी नियमितपणे व्‍यायाम करा.

3. हृदयाच्‍या आरोग्‍यासाठी आरोग्‍यदायी आहार

आहाराचा तुमच्‍या कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर परिणाम होतो. जेवणामध्‍ये हृदयाच्‍या आरोग्‍याला अनुकूल खाद्यपदार्थांचा समावेश करा, ज्‍यामध्‍ये फायबर व पौष्टिक घटक संपन्‍न प्रमाणात असतील, ज्‍यामुळे एलडीएल ('बॅड') कोलेस्‍ट्रॉल कमी होईल. आरोग्‍यदायी आहारासह योग्‍य वैद्यकीय सल्‍ला आरोग्‍यदायी हृदयासाठी आवश्‍यक आहे.

4. संतुलित वजन राखा

अधिक वजन, विशेषत: कमरेभोवती असलेल्‍या अधिक चरबीमुळे एलडीएल कोलेस्‍ट्रॉलमध्‍ये वाढ होऊ शकते. संतुलित आहाराचे सेवन व नियमित व्‍यायाम करत वजन कमी केल्‍याने कोलेस्‍ट्रॉल प्रोफाइलमध्‍ये वाढ होते. वजन संतुलित असल्‍याने हृदयविषयक आजाराचा धोका कमी होतो आणि एकूण आरोग्‍य उत्तम राहते.

5. अनारोग्‍यकारक सवयी टाळा

धूम्रपान व अधिक प्रमाणात मद्यपानाचा हृदयाचे आरोग्‍य व कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर घातक परिणाम होऊ शकतो. धूम्रपानामुळे रक्‍तवाहिन्‍यांचे नुकसान होते, ज्‍यामुळे कोलेस्‍ट्रॉल वाढते. धूम्रपान सोडणे आणि मद्यपानाचे प्रमाण कमी अशा बाबींसह हृदयाचे आरोग्‍य उत्तम राखण्‍याला प्राधान्‍य द्या.

यंदा जागतिक हृदय दिनानिमित्त या पाच आवश्‍यक उपायांसह तुमच्‍या कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर उत्तमप्रकारे नियंत्रण ठेवण्‍याचे वचन घ्‍या. नियमित वैद्यकीय मार्गदर्शन घेत, संतुलित आहाराची निवड करत, शारीरिकदृष्‍ट्या सक्रिय राहत, वजन संतुलित राखत आणि अनारोग्‍यकारक सवयी टाळत तुम्‍ही हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवू शकता. लक्षात ठेवा, आज तुम्‍ही निवडलेल्‍या प्रत्‍येक सकारात्‍मक सवयीमुळे हृदयाचे आरोग्‍य दीर्घकाळापर्यंत चांगले राहिल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news