आजचे राशिभविष्य (दि.७ जुलै २०२३)

मेष : दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या मित्रांकडून मदत मिळवा.
वृषभ ः स्पर्धेमुळे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे बनेल. खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.
मिथुन ः पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका. त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीतकमी हस्तक्षेप करा.
कर्क ः दुसर्यांना स्वभावाचा फायदा घेऊ दिल्याबद्दल स्वत:वर विशेष रागावलेले असाल. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो.
सिंह ः प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे.
कन्या ः राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. आजपासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा.
तूळ ः घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. कुटुंबाकडून कौतुक होईल. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे जोडीदारावरील तणाव वाढेल.
वृश्चिक ः खर्च करायला हवा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. नातेवाईकांना भेटून तुम्ही कल्पना केली असेल त्यापेक्षा बरे घडेल.
धनु ः वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. घरातील कामे पुरी करण्यास मुले मदत करतील.
मकर ः नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. नवीन संपर्क आणि व्यवसाय विस्तार होण्यासाठी केलेले प्रवास फलदायी ठरतील.
कुंभ ः सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात. इतरांना मदत करण्यासाठी वेळ आणि शक्ती खर्च करा
मीन ः अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात होणारी एखाद्या जुन्या मित्राची भेट उल्हसित करेल.