आजचं राशिभविष्य (दि. ३ जून २०२३)


मेष : जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. मन प्रसन्न राहील.

वृषभ : घरच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे नीट विचार करून बोला. आपल्यावर प्रेम करणार्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका.

मिथुन : तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. अनपेक्षित लाभ द़ृष्टीपथात असतील.

कर्क : मत मांडण्यास कचरू नका. आत्मविश्वास ढळू देऊ नका; अन्यथा त्यामुळे प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वत:ला व्यक्त होऊ द्या.

सिंह : आपल्या अंदाज न लावता येणार्या स्वभावाचा परिणाम वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही, याची दक्षता घ्या.

कन्या : नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. तुमच्या प्रेमाच्या द़ृष्टीने आजचा दिवस अविश्वसनीय असणार आहे.

तुळ : वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी घरातील वरिष्ठ व्यक्तीसोबत वेळ घालवू शकता.

वृश्चिक : व्यक्तिमत्त्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा.

धनु : बर्याच समस्या दूर होऊ शकतात. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल.

मकर : तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत-हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा.

कुंभ : अंगभूत चपळाईच्या कृतीने तुमचे प्रदीर्घकाळ प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील. अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील.

मीन : आज प्रकृत्ती चांगली राहील. तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल, असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा.