आजचे राशिभविष्य (२७ मे २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (२७ मे २०२३)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे.
वृषभ
वृषभ

वृषभ : घरातील समस्या तुम्हाला चिंतीत करू शकते. क्वचित भेटीगाठी होणार्‍या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे.
कर्क
कर्क

कर्क : आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल.
सिंह
सिंह

सिंह : तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल.
राशिभविष्य
कन्या

कन्या : अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत.
तुळ
तुळ

तूळ : अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : आज अचानक पैशांची आवश्यकता असू शकते आणि जवळ पर्याप्त धन नसेल. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस.
राशिभविष्य
धनु

धनु : आपल्या निर्णयात पालकांच्या मदतीची नितांत गरज असेल. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल.
मकर
मकर

मकर : ज्यांचा असाधारण प्रभाव आहे, अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. राहिलेली देणी परत मिळवाल.
कुंभ
कुंभ

कुंभ : पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. तुमचे घरगुती कामकाज, जबाबदार्‍या पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील.
मीन
मीन

मीन : काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडी-निवडी, गरजांचा विचार करा, त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल.

Back to top button