आजच आपलं राशीभविष्य (दि. ६ एप्रिल २०२३) | पुढारी

आजच आपलं राशीभविष्य (दि. ६ एप्रिल २०२३)

मेष
मेष
मेष : ठराविक काळाने येणारा मानसिक आणि शारीरिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. शरीराची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी विश्रांतीची गरज.
वृषभ
वृषभ
वृषभ : तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करील, अशी अपेक्षा बाळगू नका. विनाकारण तणावात राहू नका.
मिथुन
मिथुन
मिथुन: आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने चिंतीत राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता.
कर्क
कर्क
कर्क : समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. संकटावर मात करायची इच्छाशक्ती जबर आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
सिंह
सिंह
सिंह : तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणार्‍या सर्व संधींचे सोने करा. तुमचा रिकामा वेळ वापरा.
कन्या
कन्या
कन्या : तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही जोडीदाराशी कदाचित वाद घालाल. जोडीदाराशी प्रेमाने वागा.

तुळ
तुळ
तुळ : तुम्ही बराच काळ विचार करण्यात घालवू शकतात. तुमचे तुमच्या जोडीदाराशी भांडण होईल. एकमेकांना समजावून घ्या.
वृश्‍चिक
वृश्‍चिक
वृश्चिक : अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा; अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल.
धनु
धनु
धनु : गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. मन उत्साही राहील.
मकर
मकर
मकर : इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे.
कुंभ
कुंभ
कुंभ : मुले तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरू शकतो.
मीन
मीन
मीन : सहलीच्या ठिकाणी जाऊन प्रेमी जीवनात आनंद आणाल. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल.

 

Back to top button