Animal & Birds on Company Logo : ब्रँडेड कंपन्यांच्या लोगोवरील प्राणी पक्षी जाणून घ्या रंजक माहिती…. | पुढारी

Animal & Birds on Company Logo : ब्रँडेड कंपन्यांच्या लोगोवरील प्राणी पक्षी जाणून घ्या रंजक माहिती....

पुढारी ऑनलाइन डेस्क : Animal & Birds on Company Logo : ट्विटरने त्याचा निळा पक्षी हा लोगो बदलून एक डॉगी लोगो म्हणून ठेवला आहे. एलॉन मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर आतापर्यंत अनेक महत्वपूर्ण बदल झाले आहे. त्यापैकीच हा एक मोठा बदल आहे. आता ट्विटरच्या लोगोवर निळा पक्षी दिसणार नाही. तर त्याची जागा एका डॉगीने घेतली आहे. त्यामुळे सध्या त्याची मोठी चर्चा सुरू आहे. अशा प्रकारे प्राणी पक्ष्यांना अनेक कंपन्यांनी लोगो म्हणून ठेवले आहे. फक्त डॉगीच नाही तर मांजर, घोडा, बैल पासून अगदी मगरीपर्यंत अनेक प्राणी मोठ्या कंपन्यांच्या लोगोवर झळकली आहे. चला जाणून घेऊ या कंपन्या आणि त्यांच्या लोगोविषयी…

Animal & Birds on Company Logo : एचएमव्ही HMV (His Master’s Voice)

ही एक ब्रिटिश कंपनी आहे. याची स्थापना 1921 मध्ये झाली होती. ती ग्रामोफोन बनवत असे. या कंपनीच्या लोगोवर ‘ग्रामोफोनसह कुत्रा’ आहे. त्यावेळी हा लोगो लोकांमध्ये खूप चर्चेचा विषय बनला होता. कंपनीने याला युनिक डिजाइन म्हटले होते. ग्रामोफोन नंतर ही कंपनी कॅसेट्स, सीडी, डीव्हीडी या उद्योगात उतरली. सध्या ही कंपनी ब्रिटनच्या संगीत आणि मनोरंजन क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे.

Animal & Birds on Company Logo : हच

तुम्हाला हच या मोबाईल सिम कंपनीबद्दल माहिती असेलच. ज्याच्या पगच्या जाहिरातीने प्रेक्षकांना आकर्षित केले. हच, ज्याला नंतर व्होडाफोन म्हटले जाते आणि आज आयडियामध्ये विलीन झाल्यानंतर त्याला व्ही म्हणतात. त्यादरम्यान कंपनीने PUG संदर्भात एक पंचलाईन देखील वापरली होती, ती म्हणजे ‘Where you go we follow’.

Animal & Birds on Company Logo : Red Bull

ऑस्ट्रेलियाच्या रेड बुल या एनर्जी ड्रिंक कंपनीचा लोगो बुल म्हणजेच बैल आहे. यामध्ये दोन बैल आपआपसात लढताना दाखवलेले आहे. विजय मल्ल्याच्या किंगफिशर या बीअरच्या ब्रँडचा लोगो किंगफिशर हा पक्षी आहे.

डच बँक ING

डच बँक ING चा लोगो एक बसलेला वाघ आहे.

Le Coq Sportif

फ्रेंच स्पोर्ट्स प्रोडक्ट कंपनी Le Coq Sportif च्या लोगोमध्ये कोंबड्याचे चिन्ह आहे. जे खूप प्रसिद्ध आहे.

Animal & Birds on Company Logo : जग्वार आणि फेरारी

ब्रिटीश लग्जरी कार निर्माता कंपनी जग्वार Jaguar च्या लोगो आणि नाव दोघांमध्येही एक जंगली प्राणी जग्वार हा आहे. तर फेरारी कंपनीचा लोगो मध्ये घोडा झळकला आहे.

Animal & Birds on Company Logo : कपड्यांच्या ब्रँडवर मांजर आणि मगर

अमेरिकी कपड्याचा ब्रँड बेबी फाट चा लोगो एक मांजर आहे. तर फ्रेंच लग्जरी क्लोदिंग ब्रांड Lacoste च्या लोगोवर मगर झळकले आहे.

Animal & Birds on Company Logo : बदक, व्हेल मासा, पेंग्विन देखील लोगोसाठी कंपन्यांची पसंती

Dooney & Bourke ही अमेरिकेतील डिझायनर कंपनी आहे. त्याचा लोगो बदक आहे. व्हाइनयार्ड वाइन्स हा अमेरिकन कपडे आणि अॅक्सेसरीजचा प्रमुख ब्रँड आहे. त्याचा लोगो व्हेल मासा आहे. त्याच वेळी, पेंग्विन बुक्स या प्रकाशन संस्थेचा लोगो पेंग्विन आहे. केल्विनेटर कंपनीचा देखील अनेक दिवस पेंग्वीन हा पक्षी लोगो होता.

Animal & Birds on Company Logo : कॅमल

स्टेशनरीज मधील जगातील नावाजलेला ब्रँड कॅमल कंपनीचा लोगो उंट हा आहे. ही कंपनी विद्यार्थ्यांच्या कंपॉस बॉक्स आणि साहित्य बनविते. कॅमलचा कंपास बॉक्सने अनेक दशकांपर्यंत लहान मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

डव्ह

डव्ह ही साबण शाम्पू बनवणारी कंपनी आहे. या कंपनीच्या लोगोवर कबुतर हा पक्षी झळकला आहे. तर नेस्टले या जगप्रसिद्ध कॉफी आणि मॅगी इत्यादीसारखे खाद्य पदार्थ बनवणाऱ्या कंपनीचा लोगो घरटं पक्षी आणि पिल्लं असे आहे.

Animal & Birds on Company Logo : प्यूमा

स्पोर्ट्स वेअर बनवणारी जगप्रसिद्ध प्यूमा कंपनीचा लोगो देखील चित्ता आहे. चित्ता हा जगातील सर्वात वेगाने पळणारा प्राणी आहे.
लोगो हा एक प्रकारचे प्रतीक असतो. जे तुमच्या कंपनीच्या कार्याबद्दलची माहिती आणि ओळख व्यक्त करत असतो.

कंपन्यांव्यतिरिक्त अनेकदा सरकारी महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी देखील प्राण्याचे प्रतीक लोगोसाठी वापरले जाते. उदाहरणार्थ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. यासाठी त्यांनी सिंहाचे चित्र प्रतीक म्हणून वापरले आहे.

हे ही वाचा :

Twitter logo changed : ट्विटरवरील’ब्लू बर्ड’ गेला, त्‍याच्‍या जागी ‘डॉगी’ आला!

Jayant Patil : राज्यात कोणत्या मानसिकतेचे सरकार बसलंय ते दिसतंय- जयंत पाटील

हिंगोली : पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांची जिल्हाभरात चर्चा; अंधश्रद्धा नव्हे योगा…

Back to top button