आजचे राशिभविष्य (दि. १८ मार्च २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. १८ मार्च २०२३)

राशिभविष्य

मेष : तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे. त्याची भरपाई तुम्हाला करावी लागू शकते. नियोजनबद्ध कामे करा.

वृषभ

वृषभ : विनयशील वागण्याबद्दल तुमचे कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. मालमत्ताविषयक कामे होतील.

राशिभविष्य

मिथुन : निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल. भविष्याचा विचार करून अधिकचा पैसा गुंतवा. स्वतःला कामात गुंतवून घ्या.

कर्क

कर्क : एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता, ज्यामुळे केवळ तुम्हीच नाही, तर तुमचे कुटुंबीयदेखील आनंदी होतील.

सिंह

सिंह : दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे प्राप्त होईल, कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. घरातील वातावरण आनंदी राहील.

राशिभविष्य

कन्या : तुम्हाला शांत ठेवणाऱ्या उपक्रमांमध्ये स्वतःला गुंतवा. अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो. काही तरी खरेदी करण्याची इच्छा होईल.

तुळ

तूळ : तुम्ही संकटात सापडू शकता, याची जाणीव ठेवा. मतभेदांमुळे खासगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता. मनावर ताबा ठेवा.

राशिभविष्य

वृश्चिक : कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल. परंतु, तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका.

राशिभविष्य

धनु : नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा.

मकर

मकर : तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा.

कुंभ

कुंभ तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा.

मीन

मीन: आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. मनोबल उंचावेल.

 

 

 

Back to top button