आपलं आजचं राशिभविष्य (दि. २२ फेब्रुवारी २०२३) | पुढारी

आपलं आजचं राशिभविष्य (दि. २२ फेब्रुवारी २०२३)

राशिभविष्य
मेष
मेष : आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. धनलाभ होण्याची शक्यता.
वृषभ
वृषभ
वृषभ : आर्थिक रूपात मजबूत असाल. धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल.
मिथुन
मिथुन
मिथुन : मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. मग, त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल.
कर्क
कर्क
कर्क : आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. जोडीदार तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.
सिंह
सिंह
सिंह : भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा. हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा.
कन्या
कन्या
कन्या : इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. कारण, आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे.
तुळ
तुळ
तुळ : स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. आर्थिकद़ृष्ट्या दिवस मिळता-जुळता राहील. धनलाभही होऊ शकतो.
वृश्‍चिक
वृश्‍चिक
वृश्चिक : आजचा दिवस उत्तम दिवसापैकी एक. तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील. दिवस आनंदात जाईल.
राशिभविष्य
धनु
धनु : तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे अस्वस्थ व्हाल. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी मन सज्ज राहील.
मकर
मकर
मकर : प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल.
कुंभ
कुंभ
कुंभ : धन व्यर्थ खर्च करू नका. तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात, तर घरगुती जीवनावर परिणाम होईल.
मीन
मीन
मीन : मनःशांत ठेवण्यासाठी एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या आयुष्यात तणाव निर्माण करेल.

Back to top button