आजचे राशिभविष्य (६ फेब्रुवारी २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (६ फेब्रुवारी २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष ः नातेवाईकाच्या मदतीने व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. दिवस अत्यंत शुभ आहे.
वृषभ
वृषभ

वृषभ ः तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. निर्णय घेण्याआधी विचार नक्कीच केला पाहिजे.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन ः नातेसंबंध निकोप असूद्या. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल.
राशिभविष्य
कर्क

कर्क ः स्वभावात चंचलता आणू नका. विशेषत: जोडीदाराबरोबर वावरताना तर नकोच, अन्यथा घरातील शांततेला ते मारक ठरू शकते.
सिंह
सिंह

सिंह ः प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल.
राशिभविष्य
कन्या

कन्या ः प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी मन बैचेन होईल. शांतपणे काम करा आणि त्यात यशस्वी होईपर्यंत हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका.
तुळ
तुळ

तूळ ः चिंता, काळजी मिटविण्याची गरज असणारा काळ. शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच; पण आयुष्यदेखील कमी होते, हे लक्षात घ्यावे.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक ः ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केली, तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल.
राशिभविष्य
धनु

धनु ः तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा.
राशिभविष्य
मकर

मकर ः घरी राहण्याचा आनंद लुटू शकाल. घरातील वरिष्ठ सदस्याकडून पैशाची बचत करण्यासाठी काही सल्ला घेऊ शकता.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ ः घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात, तरी तुम्ही प्रभावी स्थितीत असाल.
मीन
मीन

मीन ः दिवस अत्यंत अविश्वसनीय असा आहे. प्रेमाचा वर्षाव करा. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल.

Back to top button