यंदा घर खरेदीचा विक्रम | पुढारी

यंदा घर खरेदीचा विक्रम

  • चालू वर्षामध्ये देशात घर खरेदीचे सर्व विक्रम मोडले आहेत. प्रॉपर्टी कन्सल्टंट ॲनारॉकच्या मते, २०२२ मध्ये टॉप ७ हाऊसिंग मार्केटमध्ये 3,64,900 पेक्षा अधिक घरांची विक्री झाली.
  • गेल्या वर्षी विक्री झालेल्या 2,36,500 घरांपेक्षा हे प्रमाण 54 टक्के जास्त आहे.
  • यापूर्वी २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे 3 लाख 43 हजार घरांची विक्री झाली होती. यावर्षी त्यापेक्षाही जास्त 6.41
    टक्के घरांची विक्री झाली.
  • मागणी वाढल्याने रिअल इस्टेट विकासकांनी दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बंगळूरमध्ये गेल्या वर्षापासून 51 टक्के जादा 3 लाख 57 हजार 600 घरांचे प्रोजेक्ट लाँच केले.
  • २०२१ मध्ये एकूण 2,36,700 घरांचे प्रोजेक्ट लाँच केले गेले होते.
  • विक्रीत मुंबई आणि वाढीमध्ये हैदराबाद अव्वल क्रमांकावर. त्यानंतर दिल्ली, बंगळूर, पुणे, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांचा क्रमांक लागतो.
  • इंदूर, भोपाळ, जयपूर यांसारख्या दुसऱ्या क्रमांकाच्या शहरांमध्ये यंदा घर खरेदीचे प्रमाण 30 ते 35 टक्के राहिले.
  • जयपूरमध्ये रिअल इस्टेट सेक्टरमधून मुद्रांक शुल्क संकलनात 36 टक्के वाढ नोंदविली गेली.

Back to top button