Nostradamus Predictions : नास्त्रेदमसने 2023 साठी केलेल्या 'भविष्यवाणी' ख-या ठरतील का? | पुढारी

Nostradamus Predictions : नास्त्रेदमसने 2023 साठी केलेल्या 'भविष्यवाणी' ख-या ठरतील का?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Nostradamus Predictions : लवकरच नवीन वर्ष 2023 मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. त्यामुळे येणारे नवीन वर्ष कोणासाठी किती फायदेशीर आणि चिंताजनक ठरेल याची वेगवेगळ्या भविष्यवेत्त्यांनी आतापासूनच भविष्यवाणी केली आहे. मात्र, संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चा होते ती नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीबद्दल. माइकल दि नास्त्रेदमस हा फ्रान्सचा सर्वात प्रसिद्ध भविष्यवेत्ता होता. 1566 मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. मात्र, त्याने आपल्या काळाच्या खूप पुढच्या तब्बल 6338 भविष्यवाण्या करून ठेवल्या आहेत. ज्यापैकी काही भविष्यवाण्या सत्य ठरल्या आहेत. त्यामुळे जगात त्याच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवणारे अनेक लोक आहेत. मात्र, असे असले तरी 2012 मध्ये पृथ्वीचा विनाश होईल, यासारख्या काही भविष्यवाणी खोट्या देखील ठरल्या आहेत.

Nostradamus Predictions : नास्त्रेदमसचे लेस प्रोफेटिज नावाचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकात त्याने अनेक भाकितं केली आहेत. ज्यापैकी काही भाकित सत्य सिद्ध झाले आहेत. त्यामुळे 2023 साठी नास्त्रेदमस ने 2023 साठी काय म्हटले आहे. याकडे अनेक जणांचे लक्ष लागलेले असते. चला तर मग जाणून घेऊया नास्त्रेदमसने 2023 साठी काय म्हटले आहे.

Nostradamus Predictions : तिसरे विश्वयुद्ध
नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीच्या अनुसार, वर्ष 2023 मध्ये तीसरे विश्व युद्ध होऊ शकते. सध्या युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरू आहे. त्यामुळे लोक नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीला केंद्रस्थानी ठेवून असे मानत आहेत की हे युद्ध पुढे तिस-या विश्व युद्धात बदलू शकते. तर काही जण चीन आणि तैवान मधील तणाव वाढून त्यांच्यात युद्ध होईल आणि अमेरिका तैवानच्या मदतीला आल्याने एका मोठ्या युद्धाचे स्वरुप त्याला मिळेल.

Nostradamus Predictions : जगावर आर्थिक संकट कोसळणार
नास्त्रेदमसच्या या भविष्यवाणीची अनेकांनी धास्ती घेतली आहे. नास्त्रेदमस ने म्हटले आहे की जगातील अनेक देशांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. काही देशात लोकांना जेवणसुद्धा मिळणार नाही.

Nostradamus Predictions : पोपवर केलेली भविष्यवाणी
नास्त्रेदमस यांनी म्हटले होते 2023 मध्ये पोप बदलतील. जर हे खरे ठरले तर पोप फ्रांसिस यांच्या जागी नवीन पोप येतील. नास्त्रेदमसने असे ही म्हटले आहे की पोप फ्रांसिस शेवटचे चांगले पोप असतील. नंतर येणारे पोप भ्रष्टाचार करतील.

Nostradamus Predictions : आगीचा वर्षाव
नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीनुसार अनेक मोठ्या सभ्यता राख होतील आणि त्यातूनच नवीन सभ्यतांचा उदय होईल. अनेक जण या भविष्यवाणीला जगाचा विनाश होईल असे पाहतात. तर काही जण फक्त जगाची व्याख्या आणि कायदे बदलतील अशा दृष्टीकोनातून या भविष्यवाणीकडे पाहत आहेत.

Nostradamus Predictions : माणूस मंगळावर पोहोचेल!
नास्त्रेदमसने मंगळ ग्रहाबाबतही भविष्यवाणी केली आहे. त्याने म्हटले होते की, मंगळ ग्रहावर प्रकाश पडत आहे. अनेक जण याचा अर्थ माणूस मंगळावर पोहोचणार आहे, असा लावत आहे. तर काही जण मंगळ मिशन संबंधित मोठे यश मिळू शकते अशा दृष्टिकोनातून याकडे पाहत आहे.

Nostradamus Predictions : दोन मोठ्या शक्ती एकत्र येतील
नास्त्रेदमस ने दोन मोठ्या शक्तींची नवीन युती होईल, अशी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, एक मजबूत पुरुष आणि एक कमजोर पुरूष किंवा महिला नेता यांच्यामध्ये ही युती होईल. नास्त्रेदमसने असेही म्हटले आहे की याचे प्रभाव चांगले असतील मात्र हे खूप दिवस टिकणार नाही.

हे ही वाचा :

Rahu Gochar : २०२३ मध्ये राहू कोणाला करणार मालामाल? कोणाचे चमकणार नशीब

Sun Venus And Mercury Conjunction 2022 : ‘या’ राशीतील लोकांना येत्या 14 दिवसात मिळू शकतो मोठा धनलाभ! हे आहे कारण…

Back to top button