आंतरराष्ट्रीय पुरुष दिन २०२२ : महिलांना पुरुषांचे ‘हे’ गुण खूप भावतात

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन २०२२
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन २०२२

पुढारी ऑनलाईन डेस्‍क – गुड लुक्‍स (चांगले दिसणे) ही गोष्‍ट वरवर पाहिली तरी प्रत्‍येक पुरूष महिलेमध्ये आणि महिला पुरूषामध्ये पाहत असतात. मात्र जेंव्हा एकत्रीत जीवन व्यतीत करण्याची वेळ येते तेव्हा चांगल्‍या दिसणेच पुरेसे ठरत नाही, तर अनेक गोष्‍टी असतात ज्‍या महिलांसाठी महत्त्वाच्या असतात. त्‍या गोष्‍टी पुरूषांमध्ये असाव्यात, असे महिलांना वाटत असते. त्‍या कोणत्‍या आहेत त्‍याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत..

आत्मविश्वास : महिलांना कॉन्फीडन्ट पुरूष हे अधिक भावतात. कॉन्फीडन्ट पुरूष हे आपल्‍या कोणत्‍याही गोष्‍टीवरून किंवा घेतलेल्‍या निर्णयावर ठाम असतात. आपले म्‍हणणे कोणासमोरही मांडताना ते परिणामांची पर्वा करत नाहीत. असे पुरूष कोणावरही अवलंबून राहत नाहीत. पुरूषांचा हा गुण महिलांना जास्‍त भावतो, मात्र ओव्हर कॉन्फीडन्स असणारे पुरूष महिलांना त्रासदायक वाटतात.

प्रगल्‍भता : महिलांना प्रगल्‍भ (मॅच्युर) पुरूष अधिक आकर्षित करतात. मॅच्युरिटी  वयासोबतच येते असे नाही, तर रोजच्या जगण्यातील अनुभवातूनही माणूस प्रगल्‍भ होत असतो. हे त्‍या पुरूषाच्या व्यक्‍तिमत्‍वातून त्‍याच्या वागण्या बोलण्यातून दिसून येत असते. प्रगल्‍भ पुरूष कोणतेही म्‍हणणे सुरूवातीला ऐकतात, समजून घेतात; मग त्‍यानंतर आपले मत व्यक्‍त करतात. ते कोणालाही चांगले वाटावे म्‍हणून कोणाच्यामध्ये उगाच हा मिसळत नाहीत. ते योग्‍य अयोग्‍य तपासूनच आपले मत व्यक्‍त करण्याचा समजुतदारपणा दाखवतात. हीच पुरूषांमधली गोष्‍ट महिलांना आवडते.

सेन्स ऑफ ह्यूमर (विनोदबुध्दी) :  नेहमी मख्ख चेहर्‍याने बसलेले, गंभीर, शांत व्यक्‍तींपेक्षा आत्‍मविश्वासासोबतच महिलांना चांगला सेन्स ऑफ ह्युमर म्‍हणजेच विनोद बुध्दी असलेले पुरूष आवडतात. कारण अशा पुरूषांसोबत असल्‍यावर त्‍यांना कंटाळा किंवा बोरींग होत नाही. त्‍या नेहमी आनंदी राहतात. त्‍यांच्यासोबत राहिल्‍यावर कधी वेळ जातो हे कळतही नाही.

फिटनेस फ्रीक (चांगले आरोग्‍य) :  चांगला फिटनेस असणे हे आजकाल क्रमप्राप्त झाले आहे. प्रत्‍येकाकडून आरोग्‍याला महत्‍व दिले जात आहे. भलेही एखाद्याचे सिक्‍स पॅक ॲब्‍स नसू देत, बायसेप्स नसू देत मात्र, तुम्‍ही जर तुमच्या फिटनेसबाबत/ आरोग्‍याबाबत जागरूक असाल तर पार्टनर म्‍हणून महिलांसाठी एकदम परफेक्‍ट आहात.

स्‍टाईलिश : आता हे जरा ज्‍यादा वाटत असले तरी महिला पुरूषांतील ही गोष्‍ट देखील बघतात. आपला ड्रेसिंग सेन्स म्‍हणजेच कपड्यांची निवड ही समोरच्या व्यक्‍तीवर व्यक्‍तीमत्‍वाची छाप पाडत असते. त्‍यामुळे कपडे निवडताना काळजी घेणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा नाही की, फॉर्मल कपडेच परिधान करावेत वेगवेगळे रंगीत कपडे वापरू नयेत. मात्र भडक रंगाचे कपडे बऱ्याच वेळा तुमच्या व्यक्‍तीमत्‍वात आकर्षकपणात अडथळा आणू शकतात.

रोमँटिकपणा :  रोमँटिकपणा हा पती-पत्‍नीच्या नात्‍यात खूप महत्‍वाचा घटक आहे. महिलांना वाटते की, तिचा जोडीदार (पार्टनर) हा थोडासा रोमँटिक असावा. भले तो छोट्या-मोठ्या प्रसंगी भेटवस्‍तू, फुले किंवा केक नाही दिला तरी चालेल, मात्र जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्‍याने आपले प्रेम व्यक्‍त करण्यात कोणतीही कसूर ठेवू नये. त्‍याने एखाद्या दिवशी आपल्‍याला पूर्णवेळ द्यावा, थोडेसे कौतूक केले तर मग सोन्याहून पिवळे…

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news