

पुढारी ऑनलाइन डेस्क : सिंगापूरच्या एका फूड डिलिवरी करणा-या एका महिलेने फूड डिलिवरी करण्यासाठी सिंगापूर ते अंटार्क्टिका असा प्रवास करून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. फूड डिलिवरी करण्यासाठी तिने तब्बल 30 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. तिने यासंबंधीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
मनसा गोपाल असे या फूड डिलीवरी एजंट महिलेचे नाव आहे. तिने ही डिलिवरी फूड पांडासाठी केली आहे. मनसा गोपाल हिला अंटार्क्टिका खंडासाठी एक मोहीम करायची होती. यासाठी ती पैसे जुळवत होती. पैशांसाठी ती वेगवेगळे प्रायोजक जुळवत होती. वेगवेगळ्या ब्रांडकडे तिने अप्लाय केला होता. 2021 पासून ती यासाठी प्रयत्न करत होती. एक महिन्यापूर्वी तिला फूड पांडाकडून यासाठी उत्तर मिळाले तसेच यातून कंपनीने अंटार्क्टिका खंडात आपल्या एका ग्राहकाला फूड डिलिवरीची योजना आखली आणि मनसाला अंटार्क्टिका खंडात मोहीम करण्याची एक संधी मिळाली.
याचा व्हिडिओ देखिल तयार करण्यात आला आहे. मनसा पहिले सिंगापूर येथून फूड ऑर्डर घेऊन विमानाने निघाली. नंतर हैम्बर्ग, ब्यूनस, एरेस आणि उशुआइया आणि नंतर अंटार्क्टिकाला पोहोचली. या क्लिपमध्ये मानसाला अनेक बर्फाच्या आणि चिखलाच्या रस्त्यांना पार करावे लागले, असे दिसत आहे.
या अनुवभाचे वर्णन करताना तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आज, मी सिंगापूर ते अंटार्क्टिकाला एक विशेष अन्न वितरण केले! ते घडवून आणण्यासाठी @foodpandasg वरील आश्चर्यकारक लोकांसोबत भागीदारी करण्यासाठी खूप उत्सुक आहे. असे नेहमी घडत नाही, पृथ्वीवरील सर्वात दुर्गम ठिकाणी तुम्हाला सिंगापूरची चव पोहोचवण्यासाठी चार खंडांमध्ये 30,000 किमी प्रवास करणे."
हे ही वाचा :