आजचे राशिभविष्य (दि.१५ नोव्हेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.१५ नोव्हेंबर २०२२)

राशिभविष्य
मेष

मेष : मित्रांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. आपले आवडते काम करू शकता. जीवनसाथीचा आनंददायी मूड तुमचा दिवस उजळून टाकेल.
वृषभ
वृषभ

वृषभ : मान्यवर व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. जे लोक खूप व्यस्त होते, त्यांना स्वतःसाठी वेळ मिळू शकतो.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : जे लोक बर्‍याच काळापासून आर्थिक तंगीतून जात आहेत, त्यांना कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते. सहकारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात.
राशिभविष्य
कर्क

कर्क : काही गोष्टी कोर्ट-कचेरीत अडकलेल्या असतील तर त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो.
सिंह
सिंह

सिंह : मुलांच्याबाबतीत सहनशीलता बाळगा. कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरा. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल.
राशिभविष्य
कन्या

कन्या : नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. सावधानता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करू शकते.
राशिभविष्य
तुळ

तूळ : तुम्हाला ध्यानधारणा आणि योगाचा फायदा होईल. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील.

राशिभविष्य

धनु

धनु : व्यापारातील नफा आज बर्‍याच व्यापार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद आणू शकतो. करिअरविषयक संधी विस्तारण्यासाठी ताकद वापरा.
राशिभविष्य
मकर

मकर : भावनांवर नियंत्रण ठेवा. अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत. जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ : व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता. वाटेत येणार्‍या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा.
मीन
मीन

मीन : आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. दिवस आनंदात जाईल.

Back to top button