Sugar Level कंट्रोलसाठी दुपारी किंवा संध्‍याकाळी केलेला व्‍यायाम ठरतो फायदेशीर : नवीन संशोधनातील निष्‍कर्ष | पुढारी

Sugar Level कंट्रोलसाठी दुपारी किंवा संध्‍याकाळी केलेला व्‍यायाम ठरतो फायदेशीर : नवीन संशोधनातील निष्‍कर्ष

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : Sugar Level कंट्रोलमध्‍ये ( नियंत्रणात ) ठेवण्‍यासाठी दुपारी आणि संध्‍याकाळचा व्‍यायाम अधिक फायदेशीर ठरतो, असा निष्‍कर्ष नेदरलँडमधील लीडेन युनिव्हर्सिटी करण्यात आलेल्या नवीन संशोधनात नोंदविण्‍यात आला आहे. डायबेटोलॉजिया जर्नलमध्ये या संशोधनातील निष्‍कर्षाची माहिती देण्‍यात आली आहे.

दुपारी किंवा संध्‍याकाळ व्‍यायाम करणाऱ्यांच्या यकृतामधील चरबी कमी होणे आणि इन्‍शुलिन नियंत्रण यावर आम्ही संशोधन केले, असे लीडेन युनिव्हर्सिटी मेडिकलमधील क्लिनिकल एपिडेमियोलॉजी विभागाचे प्रमुख जेरोन व्हॅन डेर वेल्डे यांनी म्हटलं आहे.

लठ्ठ व्‍यक्‍तींवर संशोधन

या संशाोधनासाठी सर्वप्रथम नेदरलँड्स एपिडेमियोलॉजी ऑफ ओबेसिटी (NEO) अभ्यासातील माहितीचे विश्लेषण करण्यात आले. ज्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) 27 किंवा त्याहून अधिक होता अशा ४५ ते ६५ वर्ष वयोगटातील पुरुष आणि महिलांची माहिती घेण्‍यात आली. यातील ६, ७०० जणांना संशाोधनात सहभागी करण्‍यात आले. त्‍यांची शारीरिक तपासणी करण्‍यात आली. उपाशी पाोटी आणि जेवणानंतरची शुगर लेव्‍हल तपासणीसाठी रक्‍ताचे नमुने घेतले गेले. त्‍यांच्या जीवनशैलीचीही माहिती घेण्‍यात आली.

Sugar Level : असे झाले संशोधन…

शुगर लेव्‍हल नियंत्रणात राहण्‍यासाठी कोणत्या वेळेत केलेल्या व्‍यायामाचा फायदा होतो, यावरील संशोधनासाठी ७७५ लोकांचे तीन गट करण्‍यात आले. यामध्‍ये सकाळी ६ ते दुपारी १२, दुपारी १२ ते सायंकाळी ६ आणि सायंकाळी ६ ते रात्री १२ अशा वेळामध्‍ये संशोधनात सहभागी झालेल्यांनी मध्‍यम व जलद गतीने व्‍यायाम केला. दुपारी व्यायाम केल्यास इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता १८ टक्के तर संध्याकाळी हेच प्रमाण 25% कमी होते, असे संशाोधनात आढळले. मध्‍यम व जोरकस व्‍यायामामुळे यकृतातील चरबीच्‍या प्रमाणासह इन्सुलिन प्रतिरोधकता दोन्ही कमी होते, असे आढळले. तसेच सकाळी व्‍यायाम करणार्‍यांच्‍या इन्सुलिनच्या प्रतिकारामध्ये लक्षणीय फरक आढळला नाही.

वेगाने चालणे किंवा सायकलिंगचा होतो सकारात्‍मक परिणाम

डायबेटीज 2 टाईप रूग्‍णांवर केलेल्या मागील संशोधनात दुपारी आणि सायंकाळी व्‍यायाम केल्‍याने अधिक फायदा होतो, हे
स्‍पष्‍ट झाले होते. मात्र आमच्‍या संशोधनात यासाठी मध्‍यम व उच्‍च तीव्रतेचा व्‍यायाम आवश्‍यक असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. वेगाने चालणे किंवा सायकलिंग अशा व्‍यायामाचा खूप सकारात्‍मक परिणाम होतो, असेही जेरोन व्हॅन डेर वेल्डे यांनी सांगितले.

डायबेटोलॉजिया जर्नलमध्ये या संशाोधनातील निष्‍कर्षामध्‍ये म्‍हटलं आहे की, दुपारी किंवा संध्याकाळी व्यायाम केल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते. मध्‍यम व जलद शारीरिक कसरतीमुळे यकृतातील चरबीचे प्रमाण आणि इन्सुलिन प्रतिरोधकता दोन्ही कमी होते. विशेष म्‍हणजे, जे लाोक सकाळी व्‍यायाम करतात त्‍यांच्‍या इन्सुलिनच्‍या लेव्‍हलमध्‍ये या टीमला विशेष फरक आढळला नाही. दुपारी किंवा संध्याकाळी व्यायाम केल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. टाईप २ डायबेटिज झालेल्‍या रुग्‍णांना याचा अधिक फायदा होतो, असेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

 

 

Back to top button