Horoscope : आजचे राशिभविष्य (दि.२२ ऑक्टोबर २०२२)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

Horoscope : आजचे राशिभविष्य (दि.२२ ऑक्टोबर २०२२) – ज्यो. मंगेश महाडिक

मेष : शांत राहून समाधान मिळेल. क्रोधावर नियंत्रण आवश्यक. लहानसहान गोष्टींवर जास्त विचार न करता सोडून द्या. त्याने त्रास कमी होईल.

वृषभ: अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. त्यांच्या स्वागतासाठी व त्यांच्या पाहुणचारासाठी वेळेसह खर्च करावा लागेल.

मिथुन : आपल्या मतांशी ठाम राहा. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता. कौटुंबिक सुख मिळेल.

कर्क: घरातील कामांसाठी वैयक्तिक वेगळा वेळ काढावा लागेल. अडलेली कामे होतील. प्रलंबित कामांसाठी लक्ष द्यावे लागेल. मुलांकडेही विशेष लक्ष द्यावे.

सिंह : नोकरीत सकारात्मक बदल घडून अधिकारांमध्ये वाढ होईल; मात्र सरकारी नोकरीत आपल्या कार्यकक्षेचे भान ठेवावयास लागणार. प्रलोभने टाळा.

कन्या : आपल्या बोलण्याने इतरांचे ध्यान आकर्षित कराल. मित्रमंडळींच्या समवेत मनोरंजनात वेळ व्यतीत कराल. सरकारी कामे पूर्ण होतील.

तूळ : कुटुंबीयांसाठी तसेच स्वतः साठी नवीन खरेदी कराल. घरातल्या सुखसोयींसाठी खर्च करण्याचे नियोजन कराल. दिवस मजेत जाईल.

वृश्चिक : नव्या संकल्पनांचा वापर व्यवसायामध्ये करून व्यवसायात पूरक बदल घडवू शकाल. व्यवसाय विस्ताराची कल्पना असेल.

धनु : अध्यात्मिकता, धार्मिकता याकडे कल असेल. सहकुटुंब धार्मिक प्रवासाच्या योजना आप्तेष्ट, मित्रमंडळींसह आखाल.

मकर
मकर

मकर : कुटुंबातील वडीलधाऱ्या व ज्येष्ठ मंडळींबरोबर आदराने वागा. समोरील व्यक्तीचे म्हणणे पूर्णपणे ऐकून त्यावर प्रतिक्रिया द्या. क्रोध आवरा.

कुंभ
कुंभ

कुंभ : आपल्या आवडत्या ठिकाणी भेट द्यावयास मिळाल्यामुळे आनंदित, उत्साहित राहाल. जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

मीन : आपल्याला झेपतील एवढीच कामे करण्याचे वचन इतरांना द्या. शब्दात अडकून नका. व्यापारामध्ये नवीन डावपेच आखावे लागतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news