Reading & Mental Healh : आनंदाने जगण्यासाठी वाचायलाचं हवे; जाणून घ्या वाचनाचे फायदे

Reading & Mental Healh
Reading & Mental Healh

पुढारी ऑनलाईन डेस्क : माणसाला अनेक गोष्टी समृद्ध करत असतात. त्यापैकी एक म्हणजे वाचन. पुस्तके म्हणजे ज्ञानाचा समृद्ध स्रोत. वाचनाने ज्ञान मिळतेच पण त्याबरोबर बरेच इतर फायदेही होत असतात.  जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही नेहमी काहीतरी नवीन शिकत असता.  वैविध्यपूर्ण आणि समृद्ध शैली असलेली पुस्तके व्यक्तीची सर्जनशील क्षमता आणि भाषा कौशल्ये वाढवतातच त्याचबरोबर त्याचे मानसिकही फायदे (Reading & Mental Healh) बरेच होत असतात. वाचन मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. जाणून घेवूया वाचनाचा  मनावर होणाऱ्या फायद्यांविषयी…

ताणतणाव कमी करते

तुम्ही तणावात असाल आणि तुम्हाला ताणतणाव कमी करायचा असेल तर वाचनाला आजच सुरु करा. डॉ डेव्हीड लेवियस यांनी वाचन आणि मानसिक अवस्था यावर केलेल्या अभ्यासात असे लक्षात आले आहे की, "दिवसातून ६ मिनिटे वाचन हे व्यक्तीचा ६०% मानसिक ताणतणाव कमी करते. त्याचबरोबर स्नायू ताणतणाव कमी करते आणि  मानसिक स्थितीमध्ये बदल करत तुमच्या ताणतणावाची पातळी संतुलित करण्याचा प्रयत्न करते.

वाचन तम्हाला स्मार्ट बनवते

वाचनामुळे तुम्ही दिवसेंदिवस स्मार्ट बनत जाता.  तुम्हाला नव्या संकल्पना, संस्कृती, व्यक्तिमत्व समजत असतातात. एक नवा अनुभव येत असतो. या गोष्टी व्यक्तीच्या ज्ञानात भर पाडत असतात. याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होत असतो. तुमचा ताणतणाव कमी होण्यात होतो. जेव्हा ताणतणाव कमी असेल, सकारात्मक विचार आणि बऱ्याच गोष्टींची माहीती हे तुम्हाला स्मार्ट बनवण्यास मदत करते.

Reading & Mental Healh : तुम्ही कोणती पुस्तक वाचता खूप महत्त्वाच

जेव्हा तुम्ही वाचनाला सुरुवात करता तेव्हा ती एक तुम्ही आनंदाचही कारण बनू शकते; पण तुम्ही कोणती पुस्तक वाचता खूप महत्त्वाच असतं. तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल वाचन नक्की करा. जेव्हा पुस्तक वाचता तेव्हा तुमचा ताणतणाव कमी होण्यास मदत होते. पुस्तकातील बऱ्याच गोष्टी तुमच्या विचारपप्रक्रियेला चालना देतात. चांगलं वाईट गोष्टी यातील तारतम्य समंजत एकंदरीत वाचन प्रक्रिया ही एक आनंददायी गोष्टी आहे.

वाचन वास्तवाची जाणीव करुन देते

वाचनामुळे आपल्याला वास्तवाची जाणीव होण्यास मदत होते. बऱ्याचवेळा आपण आपल्या दृष्टीकोनातून, पुर्वग्रहातून बघत असतो. त्यामुळे काही गोष्टींच्या सत्यतेपासून तुम्ही वंचित राहण्याची शक्यता असते.  वाचनातुन तुम्हाला वास्तवाची जाणीव होवू शकते.

मानसिक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास मदत

एका वैज्ञानिक संशोधनानुसार, जे वाचलं आहे ते पुन्हा बोलणे ही कृती मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते. लिव्हरपूल हेल्थ इनक्वालिटी रिसर्च इन्स्टिट्यूटने 12 महिन्यांच्या कालावधीत नैराश्याचे निदान झालेल्या लोकांसाठी दोन साप्ताहिक वाचन गट कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांचे परीक्षण केले. त्यांची सुधारित एकाग्रता, चांगली भावनिक समज, वाढलेली आत्म-जागरूकता आणि स्वत: आणि अस्तित्वाशी संबंधित अर्थपूर्ण समस्यांवर चर्चा करण्याची क्षमता नोंदवली होती तेव्हा लक्षात आले की, त्या नैराश्यग्रस्त लोकांच्या मानसिक आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

Reading & Mental Healh
Reading & Mental Healh

Reading & Mental Healh : वाचन स्मरणशक्ती वाढण्यास मदत 

एका संशोधनानुसार, जेव्हा लोक वाचन, लेखन किंवा इतर कृती कार्यक्रमात सहभागी झाले तेव्हा त्यांचा मानसिक तणाव घट होण्याचा दर 32% ने कमी झाला होता. स्मरणशक्ती वाढण्यास वाचनाचा उपयोग होत असतो. जर का तुम्हाला वाटत असेल की तुमच्या काही लक्षात राहत नाही, स्मरणशक्ती कमी होतेय तर तुम्ही वाचायला सुरुवात करा.

अलिकडच्या काही दिवसात ताणतणाव प्रचंड वाढला आहे. कोरोना काळानंतर याचे प्रमाण वाढतचं गेले. या ताणतणावाचा व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर नकारात्मक  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होतो. त्‍यामुळे तुम्‍ही दिवसभरात वाचनासाठी काही मिनिटे दिली तर वैचारिक समृद्धी‍बरोबरच मानसिक आरोग्यही सदृढ ‍ठेवा.  

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news