Samosa : खुसखुशीत आणि खमंग समोसा कसा कराल? | पुढारी

Samosa : खुसखुशीत आणि खमंग समोसा कसा कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : एखाद्या खाऊ गल्लीत किंवा राजस्थानी स्वीटमार्ट समोसा (Samosa) पहिल्यानंतर चटकन तोंडाला पाणी सुटतं. कधी एकदा घेतोय आणि कधी एकदा खातोय, असं होऊन जातं. पिझ्झा समोसा, पुदिना समोसा, पाटी समोसा आणि पंजाबी समोसा, असे विविध खुसखुशीत समोस्याचे प्रकार सध्या खाऊ गल्लीतून आपल्या खायला मिळतात. चला आज आपण खुसखुशीत समोसा कसा करायचा, याची रेसिपी पाहू…

समोसा आवरण साहित्य : दोन वाटी मैदा, एक चमचा ओवा, दोन चमचे तेल, चवीनुसार मीठ…

समोसा भाजीचे साहित्य : एक किलो बटाटा, अर्धा वाटी फ्रोजन मटार, एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा हिंग, ५-७ हिरव्या मिरच्या, १०-१२ कढीपत्त्याची पाने, दोन चमचे तेल, चवीनुसार मीठ, एक चमचा साखर, पावशेर तेल इत्यादी…

samosa

कृती : समोसा (Samosa) खुसखुशीत करायचा असेल तर, समोस्यावरील आवरण महत्वाचं असतं. त्याचं पीठ नेमकं कसं करायचं, ते पाहून घेऊ या…

१) गॅसवर कुकर ठेवून सर्व बटाटे शिजवून घ्या. बटाटे शिजेपर्यंत समोस्याची पीठ तयार करून घेऊ.

२) ओवा, मीठ आणि तेल मैद्यात टाकून एकजीव करून द्या. हे मिक्स करत असताना थोडे-थोडे पाणी टाकून हे पीठ कालवावे. लक्षा राहू दे पाणी जास्त असता कामा नये. पीठ चांगले मळून झाले की, त्याला तेल लावून २०-२५ मिनिटं बाजूला ठेवा.

३) तोपर्यंत बटाटे शिजून झालेले असतीलच, त्या बटाट्यांच्या साली काढून व्यवस्थितपणे सर्व बटाटे कुस्करून घ्या. नंतर कुस्करलेल्या बटाट्यामध्ये मिरची पावडर, धने पावडर, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ टाकून एकजीव होईपर्यंत पुन्हा कुस्करुन घ्या.

४) गॅसवर कढई ठेवून त्यात दोन चमचे तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, हिंद, कडीपत्त्याची पाने, हिरवी मिरची व्यवस्थित तडका मारा. त्यानंतर बटाट्याच्या मिश्रण टाकून घ्या. चांगल्याप्रकारे भाजून घ्या.

५) बटाट्याची भाजी कढईत गरम होत असताना अगदी थोडेसे पाणी टाकून त्यावर झाकण ठेवावे. हे पाणी टाकल्यामुळे भाजीला चांगली चव येते. नंतर गॅस बंद करून भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या. अशा पद्धतीने समोसा भाजी तयार झाली आहे.

samosa

६) आपण मघाशी मळून ठेवलेलं मैद्याचं पीठ घ्या. त्यापासून समोस्याचं आवरण तयार करून घ्यायचं आहे.तर, त्या पीठातून छोटे-छोटे गोळे तयार करून चपातीसारखे लाटून घ्या. नंतर त्याचे कोपरे एकमेकांना जोडून त्याचे कोन करून घ्या.

७) तयार केलेल्या कोनामध्ये बटाट्याची भाजी घालून कोनाचे कोपरे बंद करून घ्या. सर्व समोर एकसारखे करुन घ्या.

८) त्यानंतर मध्यम गॅसवर कढई ठेवून त्यात समोसा तळण्यासाठी तेल घ्या. ही बाब लक्षात घ्या की, तेल जास्त गरम होणार नाही याती काळजी घ्या. त्यानंतर भाजी भरलेले समोस्याचे कोन तेलात सोडा.

९) सात मिनिटं समोसे तेलात फ्राय करा. त्याला चांगला गोल्डन तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तर अशा पद्धतीने तुमचे गरमागरम खुसखुशीत समोसे तयार झाले आहेत. टोमॅटो केचप, साॅस, पुदिन्याची चटणी घेऊन समोसा खाण्यास सुरुवात करा.

रेपिसीचा व्हिडीओ पहा : चमचमीत पावभाजी घरच्या घरी कशी कराल? 

ह्या रेसिपीज वाचल्या का?

Back to top button