Intresting News : तुम्हाला काय वाटतं, फक्त तुमचीच मुलं हट्ट करतात? मग हा व्हिडिओ पाहाच! | पुढारी

Intresting News : तुम्हाला काय वाटतं, फक्त तुमचीच मुलं हट्ट करतात? मग हा व्हिडिओ पाहाच!

पुढारी ऑनलाइन डेस्क : Intresting News : लहान मुलं देवाची फुलं, असं आपण म्हणतो. लहान मुलांच्या निरागस भावांमुळे आसपासचे वातावरण आनंदी बनते. पण जेव्हा हीच मुलं त्यांच्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर हट्ट धरतात. मग आपला हट्ट पुरवला जावा यासाठी हात-पाय आदळून, जमिनीवर लोळून, मोठमोठ्याने रडून ते आपला हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या मुलांनी कधी ना कधी असा हट्ट केलाच असेल. ब-याच वेळा मोठ्या माणसांना लहान मुलांच्या अशा हट्टामुळे त्रागा होतो. पण तुम्हाला काय वाटतं फक्त तुमचीच मुलं हट्ट करतात? तुम्हाला माहिती आहे. कधी-कधी या भावना प्राण्यांमध्येही बघायला मिळतात. होय! प्राण्यांची मुले देखिल हट्ट धरतात. ट्विटरवर व्हायरल झालेल्या अशाच एका व्हिडिओमध्ये एका हत्तीणीचे पिल्लू तिच्याजवळ हट्ट करत आहे.

Intresting News : IFS अधिकारी सुशांत नंदा (IFS officer Susanta Nanda) यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका हत्तीणीचे पिल्लू तिच्यापाशी हट्ट करत आहे आणि ही हत्तीण आपल्या बाळाच्या या हट्टाकडे दूर्लक्ष करते. म्हणून हत्तीणीचे पिल्लू या थेट जमिनीवर लोळण घेते. आपल्या मुलांसारखेच कदाचित या हत्तीच्या पिल्लूलाही वाटले असेल की जमिनीवर लोळण घेतले तर आपली आई आपला हट्ट पुरवेल. पण ही हत्तीण मुलाकडे दूर्लक्ष करीत तशीच पुढे निघून जाताना दाखवली आहे. आणि तिथेच व्हिडिओ संपला आहे. त्यामुळे हत्तीणीचे हे पिल्लू नेमके कशासाठी आपल्या आईकडे हट्ट धरत होते. किंवा तिने तो पुरवला का नाही बाकी गोष्टींचा सस्पेन्स तसाच राहिला आहे.

Intresting News : या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सुशांत यांनी एवढेच लिहिले आहे की, हत्तीणीचे हे पिल्लू आई समोर लडिवाळपणे हट्ट करत आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत 30 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याच्यावर अनेक कमेंट्स पडल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओला रिट्विट केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी या हत्तीच्या पिल्लूची तुलना माणसाच्या मुलांशी केली आहे.

Intresting News : हत्ती हा बुद्धिमान आणि भावनिक प्राणी

प्राण्यांमध्ये हत्ती हा सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. तसेच हत्ती हा एक भावनिक प्राणी देखिल आहे. त्यांच्या भावना या ब-याच प्रमाणात माणसांच्या भावनांच्या जवळ असतात. हत्ती माणसांचा चांगला मित्र आहे. तसेच हत्तीला जीव लावल्यानंतर तो आपल्यासाठी प्राण देखिल देतो. जुन्या काळात युद्धांमध्ये राजे लोक हत्तींचा ताफा बाळगत असत.

हे ही वाचा:

पुणे : नवोदित महिला उद्योजिकेची साडेतेरा कोटींची फसवणूक

UPI transactions | चुकीच्या अकाउंटवर गेलेले पैसे २४ तासांत परत मिळतील, जाणून घ्या कसे?

Back to top button