डॉ. राजेंद्र गवई
केस हे चेहर्याचे सौंदर्य तर वाढवितातच; पण आपला आत्मविश्वासही खुलवितात. त्यामुळे त्यांची निगा राखणे अत्यंत गरजेचे असते. प्रत्येक केसांचे सरासरी आयुष्य 4 ते 6 वर्षे असते. रोज 50 ते 100 केस गळणे ही बाब नैसर्गिक मानली जाते. मात्र, त्यापेक्षा अधिक केस गळत असतील तरच आपण त्याला केस गळणे म्हणू शकतो.
डोक्यावरील केसांचे गळणे अनेक प्रकारचे असते. त्यापैकी एलोपेशीया ऐरीआटा' (रश्रेशिलळर रीशरींर) व 'मेल पॅटर्न बाल्डनेश' (चरश्रश रिीींंशीप लरश्रवपशीी) जास्त प्रमाणात आढळून येतात. ऐलोपेशीया ऐरीआटा (चाई) रोगामध्ये डोक्यावरील एखाद्या भागात केस अचानक गळून तिथे गोल चट्टे पडून डोक्यावरील त्वचा दिसू लागते. एकाच वेळेस अशा प्रकारचे अनेक चट्टे दिसू शकतात. भुईया व दाढीच्या भागावरही हा रोग होऊ शकतो. हा रोग आनुवांशिक मानला जातो. तणावामुळे तो उद्भवू शकतो. अनेकदा औषधोपचाराविना हा बरा होतो व चट्ट्यांवर परत केस ही येतात. तथापि, बरा न झाल्यास त्वचा रोग तज्ज्ञाच्या सल्ल्याने लोशन्स व स्टेरॉईडस्चा उपयोग करणे आवश्यक असते. मेल पॅटर्न बाल्डनेश वयाच्या विसाव्या व तिसाव्या वर्षी सुरू होतो. डोक्यावरील दोन्ही भागात समांतर केस गळतात व हळूहळू काही वर्षांनी पूर्णपणे टक्कलही पडू शकते. हा रोग अनुवांशिक आहे. आमच्या अॅलोपॅथी आरोग्य शास्त्रात मिनॉक्सीडील नावाच्या औषधाचा प्रयोग या रोगासाठी सुरू आहे. होमिओपॅथीमध्ये यावर उपचार असल्याचा या शास्त्रातील तज्ज्ञ दावा करतात. आयुर्वेदशास्त्र काही तेलांचा सल्ला तर देतातच, तसेच फळे, दूध व दुधजन्य पदार्थांचे सेवन अशा प्रकारच्या केस गळण्यासाठी उपयुक्त असल्याचेही ते सांगतात. शेदारी वनस्पतींपासून निर्माण केलेल्या पाण्यासारख्या लोशनचा उपयोगही अशा रोगाला उपयोगी असल्याचा दावा काही औषध निर्माते करतात.
हा रोग जरी आनुवांशिक असला तरी पायरॉईड ग्रंथीचे रोग व कर्करोगासाठी वापरण्यात येणारे औषध केस गळण्यास कारणीभूत ठरू शकतात. केसांना काळे करणारे व कुरळे करणारे-द्रव्यही केसांवर अपाय करू शकतात मेल पॅटर्न बाल्डनेशच्या उपचारासाठी अनेक प्रयोग सुरू असून फारसे जरी काही करता येण्यासारखे नसले तरी काहींच्या सल्ल्याप्रमाणे नियमित तेलाचा वापर योग्य आहार याचा सल्ला मानण्यास काहीच हरकत नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे तणावामुळेही केस गळू शकतात. तणावमुक्तीसाठी चित्रकला, गायन आदी छंदाचा उपयोग करता येऊ शकतो. थोडक्यात, सांगायचे तर केस हे व्यक्तिमत्त्वात निश्चितच वाद निर्माण करतात त्यामुळे त्यांची देखभाल व काळजी आवश्यकच आहे. यात काही शंका नाही.