राशिभविष्य (दि. ४ ऑगस्ट २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. ४ ऑगस्ट २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-कौटुंबिक प्रश्न सोडवण्यामध्ये दिवस जाईल. केलेल्या चुकांबद्दल पश्चाताप करण्याची वेळ येईल. पोटासंबंधित तक्रारी संभवतात. अनावश्यक खर्च होईल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. आत्मविश्वास निर्माण होईल. नवे धोरण आखाल. नव्या संधी चालून येतील. आर्थिकद़ृष्ट्या प्रगतिकारक दिवस.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-मनामध्ये विकल्प निर्माण होतील. प्रतिक्रिया देताना सावधानता आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहावे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क-सुवार्ता कानावर येईल. वस्त्र, अलंकार खरेदी करण्याचे योग.नव्या ओळखी लाभदायी ठरतील. मित्रांबरोबर सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह-ईर्ष्या निर्माण होईल. जवळच्या लोकांबरोबर संबंध बिघडण्याची शक्यता. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. परावलंबी स्वभावामुळे मनःस्ताप होईल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

कन्या-पती-पत्नींमधील वाद मिटतील. वैवाहिकद़ृष्ट्या सौख्यकारक दिवस. व्यावहारिक संतुलन साधाल. व्यावसायिक भरभराट होईल.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ-आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. कुटुंबामध्ये आनंददायी घटना घडेल. कौटुंबिक समस्यांचे निवारण होईल. कामांची जबाबदारी वाढेल. मान-सन्मान होतील. प्रतिष्ठा वाढेल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

वृश्चिक-द्विधा मनःस्थिती होईल. दवाखान्यासाठी खर्च होण्याची शक्यता. सरकारी कर थकल्यामुळे अडचणी निर्माण होतील. श्वसनासंबंधित आजार होण्याची शक्यता. काळजी घेणे आवश्यक आहे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु-आरोप-प्रत्यारोप होतील. मानहानीचे प्रसंग येतील. आरोग्याचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. जुने आजार उद्भवतील.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर-प्राप्त स्थितीचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्याल. जोडीदाराची साथ लाभेल. आपापसातील मतभेद दूर होतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-मनोइच्छित सर्व गोष्टी पूर्ण होण्याचा दिवस. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने कराल. सहकार्यातून कार्यसिद्धी होईल. यशाकडे वाटचाल कराल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन-विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक आहे. मागील गोष्टी आठवून मनःस्ताप होण्याची शक्यता. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. संयमाने वागावे लागेल.

Back to top button