

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी दिवस अनुकूल नाही. नोकरी-व्यवसायात तणाव संभवतो. शत्रू तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : धार्मिक कार्य कराल. आपली वागणूक अतिशय चांगली असणार आहे. खासगी आयुष्यात व व्यावसायिक आयुष्यामध्ये लाभ मिळणार आहेत. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : कुटुंबातील वर्तुळात आनंद असेल. दिवस चांगला जाईल. घरातील बांधकाम किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. कष्टाचा मोबदला मिळणार आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : विचारांवर विश्वास असेल. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. भावंडांसाठी दिवस अनुकूल. प्रवास होण्याची शक्यता. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : कौटुंबिक आयुष्यामध्ये समतोल साधाल. लोकप्रियता व चांगले उत्पन्न मिळेल. व्यावसायिक आघाडीवर चांगले काम होणार आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : तुमच्या इच्छा खूप कष्टानंतर पूर्ण होतील. नवीन कामे हाती घेऊ नका. व्यावसायिक अडथळ्यांवर मात कराल. आत्मविश्वासाने काम करा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : कुटुंबात किंवा व्यवसायात अडचणींना तोंड द्यावे लागेल. धीराने निर्णय घ्या. आजच्या दिवशी बौद्धिक चातुर्य कामास येईल. खर्च वाढतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : कार्यक्षेत्रात काही अडचणी आल्या तरी परिस्थितीला धीराने तोंड द्याल. नवे प्रकल्प आणि कामे यात धोका पत्करून कामे स्वीकाराल. त्याचा लाभ होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : कार्यक्षेत्रात चांगले काम कराल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन यशस्वी कराल. कामातील प्रगती आणि उत्साह बघून वरिष्ठ खूश होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : प्रेम प्रकरणात यश येईल. इच्छेप्रमाणे अनेक कामे साध्य होतील. मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. प्रतिष्ठित लोकांकडून महत्त्वाची कामे होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः सर्व बाबतीत प्रयत्नशील राहिल्यास अपेक्षित गोष्ट साध्य होईल. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. प्रवास टाळा. निर्णय विचारपूर्वक घ्या. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : मनासारख्या घटना घडतील. मधाळ बोलण्याने लोकांना आपलेसे कराल. नवीन ओळखी होतील. भागीदारीमध्ये चांगला लाभ मिळेल.[/box]
– ज्यो. मंगेश महाडिक