Self-Care : आनंदी राहण्यासाठी स्वत:ची काळजी घ्या, ‘या’ टीप्स फॅालो करा… | पुढारी

Self-Care : आनंदी राहण्यासाठी स्वत:ची काळजी घ्या, 'या' टीप्स फॅालो करा...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आजच्‍या धावपळीच्‍या जीवनशैलीत प्रत्‍येकाचे रुटीन कमालीचे व्‍यस्‍त झाले आहे. लहान मुलांपासून ज्‍येष्‍ठ नागरिकांपर्यंत प्रत्‍येकजण आपल्‍या कामात इतके व्‍यग्र असतात की, त्यांचे नकळत स्वत: कडे दुर्लक्ष होते. यातूनच ता‍‍ण-त‍णाव वाढतात. अलिकडे जीवनशैलीत बदल आणि कामकाजातील ताण-तणावामुळे स्‍वत:कडे दुर्लक्ष होते. याच दुर्लक्षामुळे मोठे आजार होण्‍याचाही धोका असतो. ( Self-Care )  स्‍वत:ची काळजी घेताना विविध संशोधनातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. जा‍णून घेवूया आनंदी राहण्यासाठी काही टीप्स….

Self-Care : शांत झोप घ्‍या

Self-Care

तुम्‍ही दररोज काही मिनिटे रीर आणि मन चा विचार करा. मात्र आपण आजारीपडल्‍यानंतरच आपल्‍या शरीराचा विचार करतो. मात्र आपण जेव्‍हा स्‍वत: काळजीचा घेण्‍याचा विचार करतो. तेव्‍हा सर्व प्रथम येते झोत. तुम्‍हाला मानसिक आणि शारीरिक दृष्‍ट्या निरोगी राहायचे असेल तर झोप ही अत्‍यंत महत्‍वाची आहे. झोप ही निरोगी आरोग्‍याचा पाया मानली जाते. आजवरच्‍या अनेक संशोधनात हे स्‍पष्‍ट झाले आहे. मात्र तणावग्रस्‍त मन हे शरीराला विश्रांती मिळू देत नाही. जर तुम्‍हाला शांत झोप हवी असेल तर सर्वप्रथम रात्रीचे रुटीन कसा असेल याचे नियोजन करा. यासाठी जेवल्‍यानंतर तत्‍काळ झोपू नका. तसेच झोपेपूर्वी कॅफीन आणि गोड पदार्थाही रात्री झोपण्‍यापूर्वी खावू नका. तसेच सर्व इलेक्‍ट्रिक डिव्‍हाईस (टीव्‍ही, लॅपटॉप, मोबाईल फोन ) हे झोपेपूर्वी किमान अर्धातास तरी लांब रहा. यामुळे झोप शांत होण्‍यास मदत होते.

आहार संतुलित ठेवा

आज सर्वांनाच आहारात अनेक पर्याय उपलब्‍ध आहेत. तुम्ही जे पदार्थ खातात याचा तुमच्‍या शरीरावर तत्‍काळ परिणाम होतो. तुम्‍ही स्‍वत:ची काळजी घेण्‍यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे हे खूप महत्त्‍वाचे ठरते. आयुर्वेदानुसार तुमचे पोट निरोगी असेल तरच तुम्‍ही निरोगी राहू शकता. त्‍यामुळे आहारावर नियंत्रण ठेवणे हेही खूप महत्त्‍वाचे आहे.

दररोज व्‍यायाम म्हणजे आर्थिक बचतच

आपल्‍या जीवनशैलीत व्‍यायाम हा सक्‍तीचा करा. तुम्‍ही कितीही बिझी असला तरी दररोजचा व्‍यायाम ठेवा. कारण व्यायामामुळे तुमचा मनःस्थिती सुधारण्यास आणि तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही मदत होते. तसेच अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत होते. चालणे आणि योगसने या दोन बाबींचा समावेश तुम्‍ही रुटीनमध्‍ये करणे आवश्‍यक आहे. कारण स्‍वत: काळजी घेत शरीर निरोगी ठेवले तर तुम्‍ही अनेक आजारांपासून स्‍वत:चे रक्षण करता आणि ही एक प्रकराची आर्थिक बचतच ठरते हे नेहमी लक्षात ठेवा

नाही म्‍हणायला शिका

अनेक जण इतरांना (मितपरिवार आणि नातेवाईक) वाईट वाटेल म्‍हणून आपल्‍या दिनचर्येत तडजोड करतात. मात्र स्‍वत:ची काळजी घेताना आहार असो की तुम्‍हाला न आवडणार्‍या गोष्‍टी याला नाही म्‍हणायला शिका. एकदा तुम्‍ही नम्रपणे नाही म्‍हणायला शिकलात तर तुमचा आत्‍मविश्‍वास वाढेल आणि स्‍वत:ची काळजी घेताना तुम्‍ही शिस्‍तबद्‍ध झाला तर इतरांसाठीही तो आदर्श ठरतो.

दिवसातील काही तास स्‍वत:साठी ठेवा

दिवसातील काही तास स्‍वत:साठी ठेवा. यामध्‍ये तुम्‍हाला जे आवडे उदा. संगीत ऐकणे, थोडा वेळ फिरायला जा, चित्र काढणे, बागकाम करा. यामुळे तुमचा तणाव कमी होईल. तसेच तुम्‍ही आवड्या गोष्‍टी केल्‍याने फ्रेश व्‍हाल आणि नव्‍याने आव्‍हानाला सामोरे जाण्‍यासाठी सज्‍ज व्‍हाल.

सहलीचा आनंद घ्‍या

तुम्‍ही वीकेंडला सहलीचे नियोजन करा. रोजचे रुटीन शिस्‍तबद्‍ध करायचे असेल तर सहलीचा दिवस हा राखीव ठेवा कारण यातुन तुम्‍हाला मिळणारी उर्जा ही मानसिकदृष्‍ट्या खूपच मदत करते. तसेच रोजचे रुटीनपासून काही वेळ तुम्‍ही लांब राहिल्‍याने आपले रोजचे काम आणखी जोमाने करता येणे शक्‍य होते.

पाळीव प्राण्‍याबरोबर काही काळ व्‍यतित करा

पाळीव प्राणी हे तुम्‍हाला नकळत स्‍वत:ची काळजी घेण्‍याची सूचना करत असतात. पाळीव प्राणी हे तुम्‍हा विनाअट प्रेम देतात. विशेषत: तुम्‍ही घरात कुत्रे पाळले असेल तर ते तुमची चिंता आणि रक्‍तदाब कमी करण्‍यास करतात, हे वैद्‍यकीय संशोधना स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे स्‍वत:ची काळजी घेण्‍यासाठी पाळीव प्राण्‍याबरोबर काही काळ व्‍यक्‍तित करणे खूप फायदेशीर ठरते.

अलिकडे जीवनशैलीत बदल आणि कामकाजातील ताण-तणावामुळे स्‍वत:कडे दुर्लक्ष होते. याच दुर्लक्षामुळे मोठे आजार होण्‍याचाही धोका असतो.  हा धोका टाळण्यासाठी आपल्या रूटीनमध्ये वरील टीप्सचा वापर करून जगण्यातील आनंद द्विगुणित करा.

 

 

 

 

 

 

 

Back to top button