वास्तु शास्त्र : ईशान्य दिशेचे काय आहे महत्त्व? या दिशेला 'या' वस्तू ठेवल्या तर होईल मोठे नुकसान | पुढारी

वास्तु शास्त्र : ईशान्य दिशेचे काय आहे महत्त्व? या दिशेला 'या' वस्तू ठेवल्या तर होईल मोठे नुकसान

वास्तुशास्त्र - ईशान्य दिशेला काय आहे महत्त्व?

पुढारी ऑनलाईन डेस्क : वास्तुशास्त्रात ईशान्य (वास्तु शास्त्र ईशान्य दिशा) (vastu shastra) दिशेला फार महत्त्व आहे. ईशान्य दिशा सर्वांत शुभ मानली गेली आहे. या दिशेला देवदेवातांचा वास असतो. त्यामुळे घर बांधताना ईशान्य दिशेकडे विशेष लक्ष असले पाहिजे. पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधली दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय. महादेवाचे अधिपत्य या दिशेला असल्याने या दिशेला ईशान्य म्हटले जाते. या दिशेचे स्वामी ग्रह गुरू आणि केतु आहेत.

घरातील सर्वांत पवित्र ठिकाण ईशान्य असल्याने या भागाला स्वच्छ आणि रिकामे ठेवावे. या ठिकाणी विहीर, बोरिंग असावे किंवा पिण्याचा पाण्याचा माठ ठेवावा. या ठिकाणी पूजा घरही बनवले जाते. घराचा मुख्य दरवाजा जर या दिशेला असेल तर शुभ मानले जाते. या दिशेला स्टोररूम, कचरा ठेवण्याची जागा, टॉयटेल, किचन असू नये. लोखंडाचे किंवा इतर अवजड सामान येथे ठेवू नये. या चुका झाल्या तर दुर्भाग्य ओढवले जाऊ शकते.

इतर दिशा आणि तिथे काय असावे?

१. पूर्व – या दिशेला प्रवेशद्वार आणि दराला तोरण असावे. या दिशेला खिडकी असणेही शुभ मानले जाते. कुटुंबप्रमुखाचे दीर्घायुष्य आणि संततीसुख यासाठी ही दिशा महत्त्वाची आहे.
२. आग्नेय – पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये ही दिशा येते. या दिशेला किचन स्टँड, गॅस, बॉयलर असावे.
३. दक्षिण – या दिशेची जागा उंच असावी. या दिशेला शौचायल असू नये. पैसा या दिशेला ठेवला तर त्यात वृद्धी होते. या दिशेला वजनदार वस्तू ठेवू नयेत.
४. नैऋत्य – दक्षिण-पश्चिम यांच्यामधील दिशेला नैऋत्य दिशा म्हणतात. या दिशेला खिडकी, दरवाजे असू नयेत. कुटुंबप्रमुखाची खोली या दिशेला असावी.
५. पश्चिम – या दिशेची जागा उंच असावी. या ठिकाणी किचन, तसेच टॉयलेट असू शकते. पण दोन्ही एकाच ठिकाणी असू नयेत.
६. वायव्य – उत्तर -पश्चिम यांच्यामध्ये वायव्य दिशा असते. या दिशेला बेडरूम, गॅरेज, गोशाळा असणे योग्य असते. घरी नोकर असतील तर त्यांची खोली या दिशेला असावी.
७. उत्तर – या दिशेला जास्त संख्येने खिडक्या, दरवाजे असावेत. बाल्कनी, वॉशबेसिन या दिशेला असावी. या दिशेत काही वास्तुदोष असला तर आर्थिक नुकसान करिअरमध्ये अडचणी निर्माण होतात.

हेही वाचा :

 

Back to top button