आजचे राशिभविष्य (दि. १ सप्टेंबर २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. १ सप्टेंबर २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – साहसाने कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. कलागुणांना वाव मिळेल. जवळच्या लोकांची मदत मोलाची ठरेल. भावंडांबरोबरचे वाद मिटतील.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – कौटुंबिक कलह टाळावा. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. सावधानता आवश्यक आहे. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. विनाकारण वेळ वाया जाईल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – अनपेक्षितपणे लाभ होतील. स्वभावामध्ये सकारात्मक बदल होतील. प्रसन्नता लाभेल. अलंकार, वस्त्र खरेदी कराल. गुंतवणूक करण्यास योग्य दिवस.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – संतुलन महत्त्वाचे आहे. सामंजस्याने प्रश्न सोडवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. व्यक्त होणे गरजेचे आहे.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – अथक प्रयत्नांना यश मिळेल. प्रवासाचे योग. नव्या व्यावसायिक धोरणांमुळे उत्कर्ष होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – कौतुकास्पद कार्य कराल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. लोककार्यामध्ये सहभाग घ्याल.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – आळस व नियोजन नसल्यामुळे कामांमध्ये अडचणी येतील. आत्मविश्वासाचा अभाव राहील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. मान-अपमानाचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक – प्रतिक्रिया देऊ नका. सावधपणे पावले उचलावीत. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. उष्णतेचे विकार होण्याची संभावना. संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – व्यवसाय निमित्ताने प्रवासाचे योग संभवतात. भागीदारीमध्ये लाभ होईल. कौटुंबिक सहलीचा योग. चर्चासत्रातून मोठे काम मिळेल. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – शत्रूंवर मात कराल. अनपेक्षित यश मिळेल. सहकार्याने कामे मार्गी लागतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. उत्साहवर्धक वातावरण राहील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – संततीबाबत चिंता निर्माण होईल. लॉटरी व सट्टा यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – वास्तूविषयक कामे लांबणीवर जातील. वादविवाद टाळावेत. आत्मचिंतनाची गरज आहे. प्रवासात मनःस्ताप होण्याची शक्यता. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे.

Back to top button