Citroen C3 : ही नवी एसयुव्ही कार भारतात लॉन्च | पुढारी

Citroen C3 : ही नवी एसयुव्ही कार भारतात लॉन्च

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

पुढारी ऑनलाईन डेस्क : Citroen C3 ची वाट पाहत असलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीकडून त्याच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. ही आकर्षक कार भारतीय बाजारात 5.71 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. या कारच्या टॉप मॉडेलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ती 8 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या पर्यंत जाते.

या SUV चे इंजिन फिचर्स

Citroen C3 ही एक सब-कॉम्पॅक्ट 4 मीटर SUV आहे, जी हॅचबॅक कार म्हणूनही ओळखली जात आहे. कंपनीने त्याचे बुकिंग लॉन्च करण्याआधीच सुरू केले होते. 21,000 रुपयांच्या टोकन रकमेवर ग्राहक ते बुक करत आहेत. या SUV मध्ये 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळेल. माहितीनुसार, याचे मायलेज 19.8kmpl पर्यंत असेल.

Citroen C3 भारतीय बाजारपेठेत 4 सिंगल कलर आणि 6 ड्युअल टोन कलर पर्यायांमध्ये सादर केली जाईल. या SUV मध्ये 56 कस्टमायझेशन पर्याय आणि 70 पेक्षा जास्त अॅक्सेसरीज पॅकेजेस देखील असतील. यामध्ये ग्राहकांना एलईडी डिआरएल लॅम्प, हेडलॅम्प, टेललॅम्प, ड्युअल टोन सी-पिलर पाहायला मिळतील.

फिचर्सच्या बाबतीत

Citroen C3 मध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले सपोर्टसह 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिमोट कीलेस एंट्री, स्पीड सेन्सिटिव्ह ऑटो डोअर लॉक, 4-स्पीकर ऑडिओ सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, फ्रंट यूएसबी चार्जर, अशी फिचर्स आहेत. ड्रायव्हर सीट, मागील पॉवर विंडो या फिचर्संसह ही कार कॉमन मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर (सीएमपी) तयार करण्यात आली आहे. भारतात तिरुवल्लूर येथे कंपनीच्या या नवी एसयूव्हीचे उत्पादन केले जाईल.

हेही वाचा

Back to top button