राशिभविष्य (दि. ०७ मार्च २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. ०७ मार्च २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष-मनपसंत खरेदी करण्याचा योग संभवतो. सज्जनांच्या सहवास ूलाभेल. संयमी वृत्तीमुळे व सहनशक्ती असल्यामुळे मोठी कामे पूर्ण होतील.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ- कोणतीही गोष्ट अती करू नका. अनावश्यक खर्च टाळा. प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन- लाभदायक दिवस. दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. छोटे प्रवास घडतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक प्रश्न सुटतील.
राशिभविष्य
कर्क

कर्क-प्रतिष्ठा वाढवणार्‍या घटना घडतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. एकमेकांशी सल्ला-मसलत करून निर्णय घ्याल. वरिष्ठांची मर्जी राखाल .
राशिभविष्य
सिंह

सिंह-मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. मनःस्ताप होईल. मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
कन्या

कन्या-दोन्ही बाजू समजून निर्णय घ्यावा. गैरसमजातून वादविवाद होतील. उष्णतेचे आणि पित्ताचे विकार होण्याची संभावना.
राशिभविष्य
तुळ

तूळ- गृहसौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. प्रलंबित कामे मार्गी लागतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये प्रगती होईल. प्रवासाचे योग संभवतात.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक – शत्रूंवर विजय प्राप्त कराल. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कौतुकास्पद काम कराल. पदोन्नतीचे योग संभवतात.
राशिभविष्य
धनु

धनु-मागील गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता. अतिसाहस करू नका. कामांचे नियोजन आवश्यक आहे. प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल.
राशिभविष्य
मकर

मकर-वाद-विवादामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. वाहने सावकाश चालवा. अनावश्यक खर्च उभे राहतील. कौटुंबिक कलह टाळण्याचा प्रयत्न करावा.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ- कला-गुणांना वाव मिळेल. लेखकांना लाभदायक दिवस. व्यावसायिक प्रगती होईल. कामांना गती मिळेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
मीन

मीन-आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. अपयश येऊ शकते. योग्य आहार व व्यायामाची गरज आहे.

राशिभविष्य

Back to top button