वरकुटे बुद्रुक(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बैल जोडी किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची नांगरट केली जाते. मात्र, इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एका शेतकऱ्याने चक्क थार गाडीने आपली शेती नांगरली. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. थार या गाडीचे सध्या मोठे आकर्षण आहे. ही गाडी खरेदी करण्यासाठी तब्बल एक वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागते. तेव्हा कुठे ही गाडी खरेदीदाराला मिळते. यावरूनच त्या गाडीची सध्या लोकप्रियता लक्षात येते.