

पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस चांगलाच चर्चेत आहे. सध्या तो आयपीएलमध्येही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. फाफ सध्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याने पत्नी सोबत परिधान केलेले भारतीय पोशाख. यावेळी त्याने कोल्हापुरी चप्पलदेखील परिधान केले आहे. (Faf Du Plessis)
चेन्नई सुपर किंग्जच्या फॅन पेजवरून फाफचा हा फो़टो शेअर करण्यात आला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये फॅमिली असे लिहिले आहे. फाफ सध्या बंगळूर संघाचा कर्णधार असताना चेन्नईच्या फॅन पेजवरून हा फोटो शेअर केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
sp;
यंदाचा आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये द. आफ्रिकेचा कर्णधार व डावखुरा फलंदाज फाफ डु प्लेसिसला चेन्नई सुपर किंग्जने रिटेन केले नव्हते. आयपीएल हंगामाच्या आधीच विराटने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
या ऑक्शनमध्ये बंगळूर नवीन संघ उभारताना कर्णधाराच्या शोधात सुद्धा होता. या ऑक्शनमधून त्यांनी फाफ डु प्लेसिसला ७ कोटी किंमतीत आपल्या संघात सामील करून घेतले. तो संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत यंदाच्या हंगामात आक्रमक फलंदाजीदेखील करताना दिसत आहे.
हेही वाचलं का ?