नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'वन रँक, वन पेन्शन' अर्थात ओआरओपीची (One Rank One Pension) देणी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 15 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. लष्कराचे माजी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांची ओआरओपीची रक्कम दीर्घकाळापासून मिळालेली नाही, या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.