

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज कोल्हापुरात आगमन होत असताना त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेली कमान पोलीस, अतिक्रमण पथकाने काढून टाकली. सायबर चौक येथे ही कारवाई आज (दि. १३) करण्यात आली. शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री हे सायंकाळी कोल्हापुरात येणार आहेत. त्यांची तपोवन मैदान येथे जाहीर सभा होणार आहे. (Eknath Shinde In Kolhapur)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (दि. 13) कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत तपोवन मैदान येथे 'शासन आपल्या दारी' (shasan aplya dari) हा कार्यक्रम सायंकाळी चार वाजता होणार आहे. त्यांच्या अगमनापूर्वीच स्वागताची कमान काढून टाकल्याने याची चर्चा जोरदार सुरु आहे. वाहतुकीस अडथळा होत असल्याने ही कमान काढली आहे. (Eknath Shinde In Kolhapur)
मुंबईहून दु. 3.45 वाजता विमानतळावर त्यांचे आगमन होईल. तेथून ते तपोवन मैदानात येणार आहेत. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम संपताच मुख्यमंत्री सायंकाळी 6.15 वाजता कोल्हापूर विमानतळावरून मुंबईला रवाना होतील.