

पुढारी डिजिटल : चिंचवड पोटनिवडणुकीत नवव्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर दिसत आहेत. नवव्या फेरीत अश्विनी यांना 32286 मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 25832 मतं मिळाली आहेत. तर बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांना 10702 मतं मिळाली आहेत. एकूण नवव्या फेरीत पुन्हा एकदा अश्विनी यांनी आघाडी घेतली आहे. नवव्या फेरीअखेर अश्विनी यांनी 6356 मतांची आघाडी घेतली आहे.
फेरी क्रमांक 9
1) अश्विनी जगताप- 31,579
2) नाना काटे- 25,205
3) राहुल कलाटे- 9,945