

हिट सीरीज 'यूफोरिया' आणि 'द आयडल' चे निर्माते केविन ट्यूरेन यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप समजलेले नाही. केविन ट्यूरेन यांच्या कुटुंबात पत्नी एवेलिना आणि दोन मुले जॅक व जेम्स आहेत. त्यांचे वडील एडवर्ड ट्यूरेन यांनी रविवारी, १३ नोव्हेंबरच्या रात्री एक स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, "केविन खूप खास होता, त्याच्या विना हे जग खूप छोटं वाटतं."
संबंधित बातम्या –
केविन ट्यूरेन यांनी पहली लॅरी क्लार्क वासुप रॉकर्सची निर्मिती केली आणि नंतर सॅम लेविंसनसोबत काम केलं. मॅल्कम अँड मेरी, ट्रे शुल्ट्जचे वेव्ज, निकोलस जारेकीचे आर्बिट्रेज, नॅट पार्करचे द बर्थ ऑफ ए नेशन, कोर्नेल मोंड्रुजोचे पीसेस ऑफ अ वुमन, रामिन बहरानी यांचे ९९ होम्सची निर्मिती केली.