

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड महिला संघाची घोषणा इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने केली आहे. १५ सदस्यीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा हीदर नाइटच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर, इंग्लड संघाची युवा अष्टपैलू खेळाडू एलिस कॅप्सीने टी-२० विश्वचषकासाठी संघात पुनरागमन केले आहे. (Women T20 World Cup)
इंग्लंडचे प्रशिक्षक जॉन लुईस यांनी अधिकृत निवेदनात माहिती दिली की, वेगवान गोलंदाजी अष्टपैलू केट क्रॉयला टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान मिळाले आहे, ती नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज मालिकेत संघाचा भाग नव्हती. २०१९ मध्ये तिने शेवटचा टी -२० सामना खेळला होता. २००९ साली इंग्लंडने पहिल्यांदा महिला टी-२० विश्वचषक जिंकला होता आणि गेल्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. (Women T20 World Cup)
यानंतर, मुख्य प्रशिक्षक जॉन लुईस म्हणाले, विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर करणे आव्हानात्मक काम होते. या संघात प्रतिभावान खेळाडू आहेत. वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या मालिकेत संघाने चांगली कामगिरी केली. या सर्व चांगल्या गोष्टी पाहिल्या तर, संघ विश्वचषक स्पर्धेच्या आव्हानाला कसे सामोरे जातो हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे."
हीदर नाइट (कर्णधार), लॉरेन बेल, माइया बौचियर, कॅथरीन ब्रंट, एलिस कॅप्सी, केट क्रॉस, फ्रेया डेव्हिस, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, एमी जोन्स, नॅट स्काइव्हर, लॉरेन विनफिल्ड-हिल, डॅनी व्याट
हेही वाचा;