Elon Musk’s Father : अ‍ॅलन मस्कच्या वडिलांना सावत्र मुलीपासून दोन मुले

Elon Musk’s Father : अ‍ॅलन मस्कच्या वडिलांना सावत्र मुलीपासून दोन मुले

Published on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : 'टेस्ला'चे अध्यक्ष तसेच जगविख्यात धनकुबेर अ‍ॅलन मस्क (Elon Musk's Father) यांचे वडील अ‍ॅरोल मस्क (वय 76) यांनी त्यांचे स्वत:च्या जाना या सावत्र मुलीशी (35) शारीरिक संबंध असल्याचे मान्य केले आहे. तिच्यापासून अ‍ॅरोल यांना दोन मुले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. जाना हिने तीन वर्षांपूर्वी अ‍ॅरोल यांच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे.

'न्यूयॉर्क पोस्ट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, अ‍ॅरोल मस्क (Elon Musk's Father) यांनी एका ब्रिटिश नियतकालिकाला ही मुलाखत दिली आहे. मुले जन्माला घालण्यासाठीच आपण पृथ्वीवर आहोत, असे विधानही त्यांनी या मुलाखतीत केले आहे. अ‍ॅरोल यांनी सांगितल्यानुसार, जानाने पहिल्या अपत्यास 2017 मध्ये जन्म दिला होता. इलियट रश असे या मुलाचे नाव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news