

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याआधी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सांगितले होते. मात्र, अद्याप खड्डे बुजवले गेले नाहीत म्हणून अधिकारी आणि ठेकेदाराला राज्याचे नगरविकास आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्या आधीच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास ठेकेदार आणि अधिकाऱ्याना सुचना दिल्या होत्या. मात्र, पावसाला संपत आला तरी अध्याप रस्त्यावरील खड्डे जसेच्या तसे दिसत आहेत.
यामुळे आज राज्याचे नगरविकास आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्याची पाहणी करत सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमएमआरडीए तसेच पालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, पावसाळ्याआधी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सांगितले होते. मात्र, अद्याप खड्डे बुजवले गेले नाहीत, खड्डे नीट बुजवता येत नसेल तर त्या अधिकाऱ्याला आणि ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा. ठेकेदारानी केलेले काम व्यवस्थित नसून आम्हाला शिव्या खाव्या लागतात अशा कडक शब्दांत अधिकाऱ्यांना सांगितले.
तसेच त्यांनी पैसे देऊनही ठेकेदार असे काम करतात. त्यामुळे सरकारचे नाव खराब होते. यापुढे कामात हलगर्जीपणा करू नका अशी सक्त ताकीद शिंदे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी त्यांच्याच ऐतवडे बुद्रुक गावात उभ्या केलेल्या शाळेला भेट