Earthquake in Iran : भूकंपाने इराण हादरले, 7 जणांचा मृत्यू, 440 जखमी

 Earthquake
Earthquake
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : इराणच्या उत्तर पश्चिम भागातील अजरबैजान प्रांतातील खोए शहर शनिवारी रात्री भूकंपाने Earthquake in Iran हादरले. 5.9 तीव्रतेचा हा भूकंप होता. भूकंपात मोठी जीवित आणि वित्त हानी झाल्याची माहिती आहे. टीआरटी वर्ल्डने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास 440 लोक जखमी झाले आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार खोए शहराशिवाय त्याच्या जवळपासच्या शहरांमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यूएसजीएस ने दिलेल्या माहितीनुसार, यूएसजीएसने दिलेल्या वेळेनुसार, 11 वाजून 44 मिनिटे 44 सेकंदांला(यूटीसी+5.30) हा भूकंप झाला. Earthquake in Iran

इराणमधील खोय शहर हा खोय काउंटीमधील शहर आहे. ही इराणच्या पश्चिम अजरबैजान प्रांतातील राजधानी आहे. इराणी समाचार एजन्सी आयआरएनए ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के खूप तीव्र होते. याची तीव्रता इतकी होती की खोय शहरासह संपूर्ण पश्चिम अजरबैजान प्रांत आणि शेजारील पूर्व अजरबैजान प्रांताची राजधानी तबरेज शहरासहित अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. Earthquake in Iran

लष्करी प्लांटमध्ये मोठा स्फोट

याशिवाय काल इराणच्या मध्यवर्ती शहर इस्फहानमधील लष्करी प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. हा एक "अयशस्वी" ड्रोन हल्ला होता, इराणच्या मीडियाने संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत रॉयटर्सने याचा अहवाल दिला.

IRIB ने अधिक तपशील न देता कळवले की, संरक्षण मंत्रालयाच्या दारूगोळा उत्पादन केंद्रांपैकी एका ठिकाणी हा स्फोट झाला आणि इस्फहान गव्हर्नोरेटच्या राजकीय आणि सुरक्षा उपप्रमुखांच्या घोषणेनुसार. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news