

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानमध्ये आज (दि.७) दुपारी १२.११ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. Afghanistan
अर्ध्या तासात अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात तीन शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसले. 12:19 वाजता 5.6 आणि 12:11 वाजता 6.1 च्या भूकंपानंतर 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप दुपारी 12:42 वाजता नोंदवला गेला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले. हेरात शहराच्या वायव्येस 40 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.
यापूर्वी ४ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानच्या फैजाबादला ४.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. 28 ऑगस्ट रोजी, 4.8 रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप देशाच्या काही भागांना बसला होता.
हेही वाचा