

पुढारी ऑनलाईन: जपानमध्ये आज (दि.२६) दुपारी ३. ३३ वाजेच्या सुमारास जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू जपानच्या टोकियो शहराच्या आग्नेयेला १०७ किमी अंतरावर, ६५ किमी खोलीवर होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
भूकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर, जपानमध्ये त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. तसेच या भूकंपामुळे चिबा आणि इबाराकी प्रीफेक्चर या भागात जोरदार हादरे जाणवले. USGS ने दिलेल्या माहितीत सांगितले की, या भूकंपामुळे अधिक नुकसान होण्याची शक्यता खूप कमी आहे.