

पुढारी ऑनलाईन : कारची विंडशील्ड म्हणजेच पुढची काच खराब होणे किंवा काचेला तडा जाणे ही एक मोठी आणि खर्चिक गोष्ट आहे. तुमच्या एका छोट्या चुकीमुळे कारची दर्शनी काच फुटू शकते. कारच्या काचेला तडा जाणे किंवा फुटण्याची अनेक कारणे असू शकतात. ओबड-धोबड रस्त्यावरून वारंवार प्रवास होत असल्यासही कारची काच खराब होऊ शकते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या कारच्या विंडशील्डची काळजी घेऊ शकता..
बऱ्याचवेळा कारची विंडशील्ड ही खराब दर्जा (क्वालिटी) मुळेही फुटू शकते. अशावेळी एक छोटासा धक्काही या काचेचे नुकसान करू शकतो. त्यामुळे कार खरेदी करताना काचेचा दर्जा पाहणे गरजेचे असते.
कारची काच योग्यरित्या फ्रेममध्ये बसली नसेल तरीही ती फुटू शकते. बऱ्याचवेळा विंडशील्डचा आकार फ्रेमनुसार नसतो ज्यामुळेही काच फुटू शकते. काच फ्रेममध्ये व्यवस्थित फिट न बसल्यामुळे काचेत आणि फ्रेममध्ये अंतर राहिल्याने काच फुटते. अशावेळी आपण जेंव्हा कारचा वेग वाढवतो त्यावेळी होणाऱ्या व्हाईब्रेशनमुळेही काच फुटू शकते.
तापमान अतिथंड झाल्यावर देखील काच तडकू शकते. त्यासोबतच जर तीव्र सूर्यप्रकाश असलेल्या भागात किंवा सतत उन्हामध्ये कार लावल्यामुळे उष्णतेमुळे काचेच्या बाहेरील कडा पसरू लागतात. ज्यामुळे काच फ्रेममधून सुटणे किंवा तडकण्याचा धोका असतो. त्यामुळे कार सावलीमध्ये पार्क करणे सोयीचे ठरते.
हेही वाचा :