UAE rains: दुबईत पुन्हा पावसाचा हाहाकार; अबुधाबीत पूरपरिस्थिती, विमानसेवा बंद

UAE rains
UAE rains
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: दुबईला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे अबुधाबी शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील खोळंबली आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (UAE rains)

संयुक्त अरब अमिरातीमध्ये एप्रिलमध्ये तीव्र पूर आल्याच्या काही दिवसांनंतर, गुरुवारी (दि.२ मे) पहाटे मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळांनी अबू धाबी आणि दुबईला झोडपले. यामुळे काही भागांमध्ये पाणी साचल्याने उड्डाण रद्द झाले आणि दुबईमध्ये बस सेवा देखील बंद करण्यात आली आहे. (UAE rains)

खलीज टाईम्सच्या म्हणण्यानुसार, दुबईला जाणारी पाच इनबाउंड फ्लाइट्स रात्रभर वळवण्यात आली, तर नऊ आगमन आणि चार आउटबाउंड फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या. एमिरेट्सच्या अनेक उड्डाणेही रद्द करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दुबईतील रहिवासी गुरुवारी पहाटे 3 वाजता जोरदार वारा, गडगडाट आणि विजेच्या कडकडाटाने जागे झाल्याचेही वृत्तात म्हटले आहे. (UAE rains)

दुबईत वादळी पावसाला अचानक सुरूवात झाल्यानंतर सुमारे एक तासानंतर, आज पहाटे ४ वाजता, देशाच्या हवामान खात्याने एम्बर अलर्ट जारी केला. ज्याने सूचित केले की, पावसाचे ढग देशाच्या बहुतेक भागांना व्यापले आहेत. तसेच शुक्रवार ३ मे पर्यंत देशभरात प्रतिकूल हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रहिवाशांना पावसाळ्यात सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करण्याचा सल्ला देखील येथील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

अबू धाबीच्या काही भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याचे वृत्त आहे, तर जेबेल अली, अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ, दुबई इंडस्ट्रियल सिटी, दुबई इन्व्हेस्टमेंट पार्क आणि जुमेराह व्हिलेज ट्रँगलमध्ये जोरदार वारे वाहत असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. या वर्षी एप्रिलमध्ये दुबईच्या वाळवंट शहरात आलेल्या विक्रमी वादळामुळे किमान तीन लोकांचा मृत्यू झाला आणि सामान्य जीवन विस्कळीत झाले, ज्यामुळे उड्डाणे निलंबित झाल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news