मुंबई : रेल्वे रुळावर लोखंडी ड्रम ठेवून घातपाताचा प्रयत्न, मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला, सँडहर्स्ट रोड -भायखळा दरम्यानची घटना

रेल्वे रुळावर लोखंडी ड्रम
रेल्वे रुळावर लोखंडी ड्रम
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावरील रुळांवर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम आडवा पडला होता. खोपोली लोकलच्या मोटरमनने लोखंडी ड्रम पाहून आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळला. परंतु दर चार मिनिटांनी लोकल धावत असलेल्या रेल्वे रुळांवर लोखंडी ड्रम कोणी ठेवला याचा तपास करण्यात येत आहे.

तब्बल दोन वर्षानंतर मुंबईत निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. या उत्साहात कोणताही घातपात होऊन नये, म्हणून सर्वच सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. तरीही गुरुवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अज्ञान व्यक्तीकडून दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम रेल्वे रुळावर टाकून घातपात करण्याचा प्रकार घडला.

काल (गुरुवार) दुपारी ३ वाजून १० मिनिटाची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून खोपोली जलद लोकल निघाली होती. सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानकादरम्यान लोकल आली असता, रुळावर एक दगडाने भरलेल्या लोखंडी ड्रम मोटरमन अशोक शर्मा यांना दिसला. मोटरमन अशोक शर्मा यांनी तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावला. परंतु लोकल वेगात असल्याने लोकलचा पहिला डबा ड्रमवरून गेल्याने मोठ्याने आवाज आला. लोकल थांबल्यानंतर मोटरमन अशोक शर्मा यांनी रुळावर उतरुन प्रवाशांच्या मदतीने तो लोखंडी ड्रम काढला आणि घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर रेल्वेच्या अभियांत्रिकी अधिकाऱ्यांनी भायखळा स्थानकांत आलेल्या लोकलची पाहणी केली. या पाहणी दरम्यान लोकल सुरक्षित असल्याने खोपोलीच्या दिशेने रवाना करण्यात आली.

घटनेनंतर रेल्वे सतर्क 

या घटनेनंतर मध्य रेल्वेचे आरपीएफ अधिक सर्तक झाले आहे. रेल्वे रुळांवरील पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध १५४ अंतर्गत भायखळा आरपीएफकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम दिसला. तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावून लोकल थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्ष आणि गार्डला दिली. प्रवाशांचा सुरक्षित प्रवास हेच आमचे प्रथम ध्येय आहे.
– अशोक शर्मा, मोटरमन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news